कोपरगाव तालुका
गंगागिरी महाविद्यालयाच्या सदस्यपदी संदीप वर्पे यांची नियुक्ती
कोपरगाव (प्रतिनिधी )
अहमदनगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांची कोपरगाव येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालयाच्या सदस्यपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे.त्यांच्या निवडीचे कोपरगाव शहर व तालुक्यात स्वागत होत आहे.
रयत शिक्षण संस्थेच्या कोपरगाव येथील श्री सद्गुरू गंगागिरी महाराज महाविद्यालय हे उत्तर महाराष्ट्रात नावाजलेले महाविद्यालय मानले जाते.बऱ्याच वेळा या महाविद्यालयाने नॅकची “ए” हे मानांकन प्राप्त केले आहे.येथील विद्यार्थी हे चांगल्या स्रेनीतील गणले जातात.वर्तमानात या महाविद्यालयातील व्यवस्थापन बरेच बदलले असून अनेक फेरफार केले गेले आहेत.या महाविद्यालयाची नवीन सल्लागार समिती नियुक्ती नुकतीच वरिष्ट पातळीवरून सातारा येथून करण्यात आली आहे.त्यात राष्ट्रवादीचे वर्तमान जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांची सदस्य पदी निवड करण्यात आली असल्याचे पत्र (क्रं.-15309,दि.9/9/2019) त्यांना नुकतेच प्राप्त झाले आहे.त्यावर रयत शिक्षण संस्थेचे सचिव यांची सही आहे.संदीप वर्पे हे राष्ट्रवादीचे संस्थापक माजी केंद्रीय मंत्री शरद पवार व अजित पवार यांचे निष्ठावान सहकारी मानले जातात.त्यांचे व कोपरगावातील राष्ट्रवादीचे युवा नेते आशुतोष काळे यांचेही घनिष्ठ संबंध आहेत. त्यांच्या निवडीचे माजी आ. अशोक काळे,कर्मवीर काळे कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुनील गंगूले, जिल्हा उपाध्यक्ष दीपक साळुंके,तालुकाध्यक्ष मच्छीन्द्र खिलारी आदींनी अभिनंदन केले आहे.वर्पे यांनी या पूर्वीही या समितीवर काम केले आहे त्यांची या पदावर दुसऱ्यांदा निवड होत आहे.