जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शासनाने अडचणीत सापडलेल्या संघांकडून पूर्ण क्षमतेने दूध खरेदी करावे-मागणी

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोरोना महामारीमुळे राज्यभरात लॉकडाऊन सुरु असल्याने दुग्ध व्यवसाय सद्या मोठ्या संकटात सापडला असून शासन पूर्ण क्षमतेने दूध स्वीकारीत नसल्याने दुधावर प्रक्रिया करणारे दृध संघ व प्रकल्पांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.ही गंभिर परिस्थिती विचारात घेऊन शासनाने १०० टक्के दूध खरेदी करावे अशी मागणी गोदावरी खोरे नामदेवराव परजणे पाटील तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

“सहकारी दूध संघांकडे संकलित होणारे दूध शासन पूर्ण क्षमतेने खरेदी करीत नसल्याने दूध शिल्लक राहात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्यासाठी संघांपुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.भविष्यात दूध खरेदी बंद ठेवण्याची वेळ आली तर दूध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडतील”राजेश परजणे, अध्यक्ष,गोदावरी-परजणे सहकारी दूध संघ,कोपरगाव.

महाराष्ट्र राज्यात शेतीला पुरक म्हणून ओळखला जाणारा दुग्ध व्यवसायात सद्या अडचणीत सापडला आहे.त्यातच कोरोना महामारीमुळे राज्यात टाळेबंदी सुरु असल्याने दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री करण्याची वेळ सकाळी ७ ते ११ करण्यात आलेली आहे.वेळेच्या या बंधनामुळे दुधाची विक्री सुमारे ६० टक्क्यांनी तर दुग्धजन्य पदार्थांची विक्री ७५ टक्क्यांनी कमी झालेली आहे.याचा विपरीत परिणाम दूध संघांवर व दूध संकलन करणाऱ्या संस्थांवर झालेला आहे.संघाला माल पुरवठा करणारे व्यावसायिक तसेच दूध उत्पादकांची देणी,कर्मचाऱ्यांचे पगार,प्रक्रिया खर्च भागविणेही संघांना सद्या कठीण झालेले आहे ही परिस्थिती अशीच राहिली तर दुग्ध व्यवसाय अडचणीत सापडण्याची आणि या व्यवसायावर अवलंबून असलेल्या श्रमजिवी वर्गावर उपासमारची वेळ येण्याची भिती निर्माण झाली आहे. हजारो कुटुंबांचे संसार या व्यवसायावर अवलंबून आहे.

सद्या राज्यातील कोरोना संसर्गाची अतिशय चिंताजनक परिस्थिती आहे.लॉकडाऊन सुरु झाल्याने दूध व दुग्धजन्य पदार्थांची ग्राहकांकडून खरेदी कमी झाली आहे.एकतर गेल्यावर्षी कोरोनाच्या संकटात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर तोटा सहन केला.दोन तीन महिन्यात परिस्थिती थोडीफार सुधारलेली असतानाच पुन्हा कोरोना महामारीने डोके वर काढल्याने आता पुन्हा टाळेबंदी करण्याची वेळ आलेली आहे.दूध संघांकडे संकलित होणारे दूध शासन पूर्ण क्षमतेने खरेदी करीत नसल्याने दूध शिल्लक राहात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांकडून दूध खरेदी करण्यासाठी संघांपुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.भविष्यात दूध खरेदी बंद ठेवण्याची वेळ आली तर दूध उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडतील.शेतीला पुरक असलेला हा व्यवसाय धोक्यात आला तर दूध उत्पादक देशोधडीला लागतील.

दुग्ध व्यवसायाला व या व्यवसायाशी निगडीत असलेल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना कोरोना महामारीच्या संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनाने १०० टक्के दूध स्वीकारणे गरजेचे असून दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीच्या वेळेत देखील वाढ करण्याची आवश्यकता असून याबाबत राज्य सरकारच्या पातळीवर गांभिर्याने विचार व्हावा अशी विनंतीही श्री परजणे पाटील यांनी केली. या पत्राच्या प्रती उपमुख्यमंत्री ना.अजित पवार व दुग्धविकास मंत्री ना.सुनिल केदार यांनाही पाठविल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close