जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव नगरपरिषदेच्या कर्मचा-यांनी स्वच्छतेची शपथ घेवून केले श्रमदान”

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने शनिवार दि.११ सप्टेंबर पासून “स्वच्छता हिच सेवा” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत आज नगरपरिषदेच्या सर्व कर्मचा-यांनी स्वच्छतेची शपथ घेवून आठवड्याला दोन तास देऊन आपले घर, परिसर, कार्यालय स्वच्छ ठेवून कचरा होणार नाही व करणार नसल्याची शपथ घेतली आहे.नगरपरिषदेच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या सत्ता संपादनाच्या कालखंडात देशाच्या स्वच्छतेचा मंत्र देशवासियांना दिला व या मोहिमेद्वारे देशभरात जनजागृती सुरु ठेवली आहे.आता त्यांनी प्लास्टिक मुक्तीची घोषणा केली आहे.या योजनेनुसार आता “आपण प्लॅस्टिकचा वापर करणार नाही”या उपक्रमाची सुरुवात केली आहे. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी कार्यालय परिसर व जिजामाता उद्यान परिसर श्रमदान करून स्वच्छता केली. त्यावेळी जमा झालेल्या काच-यातून अंदाजे ३ ते ४ किलो प्लास्टिक वेगळे केले आहे.
“स्वच्छता हिच सेवा” हा उपक्रमा अंतर्गत कोपरगाव नगरीमध्ये पथनाट्य, प्रभातफेरी, भिंती रंगवुन, उद्याने स्वच्छता, श्रमदान करून जमा झालेल्या कच-यातुन प्लास्टिक वेगळे करणे इत्यादी माध्यमातून जाणीव जागृती करून आपला परिसर, प्रभाग, शहर अधिकाअधिक स्वच्छ व सुंदर ठेवण्याची शपथ घेण्यात आली आहे.
यावेळी नगरपरिषद मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी उपस्थित कर्मचारी व अधिकारी यांना मार्गदर्शन करून आपले कोपरगांव शहर स्वच्छ सर्वेक्षण २०२० च्या स्पर्धेत अव्वल आणण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याबाबत आवाहन केले. उपस्थितांना उपमुख्याधिकारी सुनिल गोर्डे यांनी शपथ दिली आहे. यावेळी आरोग्य सभापती अनिल आव्हाड, स्वच्छता निरीक्षक सुनिल आरणे, नोडल अधिकारी महारुद्र गालट, जिओकॅान संस्थेचे नामदेव मुकणे, धनश्री गुजर यांच्या सह सर्व विभागाचे विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Close
Close