गुन्हे विषयक
वेळापूर शिवारात ट्रक-मोटारसायकल अपघात, कोपरगावातील एक ठार
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव ( प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील शिर्डी लासलगाव रस्त्यावर वेळापूर शिवारात ब्राम्हणनाल्याजवळ चार सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास ट्रक क्रं. एम.एच.17-टी.9100 हि चासनळी कडून कोळपेवाडीच्या दिशेने जात असताना त्या वरील चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून आपल्या ताब्यातील वाहन भरधाव चालवून समोरून येणारी मोटार सायकल क्रं. एम.एच.17.सी.एच.2102 हिला जोराची धडक देऊन त्या वरील कोपरगाव येथिल भाजीपाला विक्रेता दुचाकीस्वार राजू विश्वनाथ शेंडे यांच्या दुचाकीला जोराची धडक देऊन मृत्यूला कारणीभूत झाल्या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची दुर्घटना घडल्या नंतर ट्रक चालक कोणालाही काही एक खबर न देताच निघून गेला आहे.या प्रकरणी तालुका पोलिसांनी आधी अकस्मात मृत्यू दप्तरी नोंद केली होती मात्र नंतर त्या जागी ट्रक चालका विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.या प्रकरणी फिर्यादी पंकज विश्वनाथ शेंडे यांच्या तक्रारीवरून तालुका पोलिसांनी ट्रक चालका विरुद्ध गु.र.नं.134/2019 भा.द.वी. कलम 304 (अ)179,338,427,मो.वा.कायदा कलम 184,134,(अ),(ब),177 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अनिल कटके यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एम.ए. कुसारे हे करीत आहेत.