जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आचारसंहिता भंगाची पहिल्या दिवशी कारवाई नाही-निवडणूक अधिकाऱ्यांचा “यू टर्न”

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदारसंघात पहिल्याच दिवशी आचारसंहितेचा भंग होऊनही त्या विरोधात जनशक्तीने बातमी देऊन लक्षवेध केल्यावर आज त्याची सहाय्यक निवडणूक अधिकारी योगेश चंद्रे यांनी गंभीर दखल घेतली असून मतदारसंघ मोठा असल्याने अद्याप या मतदारसंघातील संपूर्ण फलक काढण्याचे काम पूर्ण झाले नसल्याने आज सायंकाळपर्यंत राजकीय पक्षांना सूट दिली असल्याने कारवाई होणार नसल्याची सारवासारव कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी आज सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास केली आहे.

आमच्या प्रतिनिधीने सहाय्यक निवडणूक अधिकारी चंद्रे यांच्याशी सम्पर्क साधला असता त्यांनी अद्याप फलक काढण्याचे काम सुरूच असून आज सांयकाळी सहा वाजे पर्यंत ते पूर्ण होईल व त्या नंतर जर आदर्श आचारसंहितेचा भंग झाला तर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि,निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त सुनील अरोरा यांनी राज्यात आचारसंहिता लागू केली होती.त्यानुसार या आचारसंहितेचे पालन सर्वच राजकीय पक्ष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी करणे अपेक्षित होते.त्यासाठी निवडणूक अधिकारी राहुल मुंडके व सहाय्यक निवडणूक अधिकारी योगेश चंद्रे यांनी 21 सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पत्रकार परिषद घेऊन आचार संहिता लागू केली असल्याची घोषणा केली होती.व मतदारसंघातील सर्व राजकीय फलक हटविण्यात आल्याचा दावा केला होता.

तथापि संवत्सर,भोजडे,जवळके आदी ठिकाणी राजकीय पक्षांचे फलक मतदारसंघात तसेच असल्याची बाब आज सकाळी जनशक्तीने प्रकाश झोतात आणली होती.त्यामुळे निवडणूक आयोग व अधिकाऱ्यांचा दुसऱ्याच दिवशी फुगा फुटला होता.अशा आशयाची बातमी सकाळी प्रकाशित करण्यात आली होती.त्याची गंभीर दखल निवडणूक अधिकाऱ्यांना घ्यावी लागली.व सदरचे फलक तातडीने काढावे लागले.दुपारी पाच वाजेच्या सुमारास आमच्या प्रतिनिधीने सहाय्यक निवडणूक अधिकारी चंद्रे यांच्याशी सम्पर्क साधला असता त्यांनी अद्याप फलक काढण्याचे काम सुरूच असून आज सांयकाळी सहा वाजे पर्यंत ते पूर्ण होईल व त्या नंतर जर आदर्श आचारसंहितेचा भंग झाला तर कारवाई केली जाईल असा इशारा दिला आहे. त्यामुळे पहिल्याच दिवशी आचारसंहितेचा फज्जा उडाल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close