जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात परजणे गट खरेच विधानसभा निवडणूक लढवणार ! तालुक्यात चर्चेला उधाण

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा निवडणुकीसह राज्याची विधानसभेची निवडणूक आज दुपारी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलीय आहे.महाराष्ट्रात तेराव्या विधानसभेचा कार्यकाळ नऊ नोव्हेंबर रोजी संपत असल्याने त्याआधी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे गरजेचे आहे.त्यामूळे महाराष्ट्र व हरियाणा राज्यात निवडणूक आयोगाने आदर्श आचारसंहिता लागू केली आहे.महाराष्ट्रात 21 ऑक्टोबरला मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.तर 24 ऑक्टोबरला मतमोजणीचे निकाल जाहीर होणार आहे.म्हणजेच दिवाळी पूर्वीच नवे सरकार अस्तित्वात येणार आहे.राज्यात 8 कोटी 94 लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

गेल्या काही वर्षात राजकारणाचे गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे.निवडणुकांवर पैशांचा प्रभाव वाढतोय आहे.स्थानिक स्वराज्य निवडणुकीपासून ते लोकसभेपर्यंत कोणतीही निवडणूक म्हणजे पैशाचा खेळ होऊन बसला आहे.आर्थिक ,शारीरिक अशा दोन्ही बळाशिवाय निवडणुका लढवता येत नाही.असे अनेक पुढारी उघडपणे बोलून दाखवतात.गत पाच वर्ष तालुक्यात चाललेला खेळ मतदारांनी अनुभवला आहेच.त्याला दुसरा पुरावा देण्याची गरज नाही.अशा बळावर निवडून आलेले हे नेते आपल्या मूळ भांडवलावर नफा कमविण्याचे म्हणजेच केलेल्या गुंतवणुकीची नफ्यासह वसुली केल्याशिवाय राहत नाही.मात्र वरवर त्याची सांगड समाजकार्याशी घालून साळसुदपणाचा आव मात्र आणला जातो.

गत निवडणुकीत 15 ऑक्टोबरला मतदान पार पडले होते.व त्याचे निकाल 19 ऑक्टोबरला जाहीर झाले होते.या वेळी हि निवडणूक पाच ते सहा दिवस उशिरा होणार आहे.त्यामुळे आता सर्वच पक्ष-पार्ट्या आपल्या कामाला लागल्या आहेत.पक्ष आणि त्यांच्या नेत्यांनी आपल्या राऊतांची गोळाबेरीज सुरु केली आहे.नालमेख,तंगतोबरा आदी कामांना गती आली आहे.आपल्या बारगिरांना सज्ज राहण्याचा हुकूम झाला आहे.बॅनर,झेंडे,काठ्या,स्टिकर,बिल्ले आदी रसद तयार करण्याचे आदेश झाले आहेत.बऱ्याच नेत्यांनी आपला पक्ष कोणता हे ठरवलेले नसताना पक्षाची चिन्हे गावोगाव पसरवली आहे,आता ती आणि नेत्यांचा ताळमेळ राहतो कि नाही हे आगामी काळ ठरवणार आहे.गेल्या काही वर्षात राजकारणाचे गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणावर झाले आहे.निवडणुकांवर पैशांचा प्रभाव वाढतोय आहे.स्थानिक स्वराज्य निवडणुकीपासून ते लोकसभेपर्यंत कोणतीही निवडणूक म्हणजे पैशाचा खेळ होऊन बसला आहे.आर्थिक ,शारीरिक अशा दोन्ही बळाशिवाय निवडणुका लढवता येत नाही.असे अनेक पुढारी उघडपणे बोलून दाखवतात.गत पाच वर्ष तालुक्यात चाललेला खेळ मतदारांनी अनुभवला आहेच.त्याला दुसरा पुरावा देण्याची गरज नाही.अशा बळावर निवडून आलेले हे नेते आपल्या मूळ भांडवलावर नफा कमविण्याचे म्हणजेच केलेल्या गुंतवणुकीची नफ्यासह वसुली केल्याशिवाय राहत नाही.मात्र वरवर त्याची सांगड समाजकार्याशी घालून साळसुदपणाचा आव आणला जातो.निवडणूक आता या अर्थाने सामान्य माणसाच्या आवाक्यात राहिलेली नाही.आता यात सगळेच वाईट आहेत असे नाही पण बहुतांशी मात्र तसेच आहेत.

काही शिक्षक,प्राध्यापक कॉलनीत रात्री दोन-दोन वाजे पर्यंत आपल्या वाट्याच्या नोटा आल्या का नाही यासाठी आपले दरवाजे सताड उघडे ठेऊन असतात.खरे तर निवडणूक प्रक्रिया अधिक सुटसुटीत करणे व तिचे शुद्धीकरण करण्यासाठी हे घटक का योगदान देत नाही.रात्रीस चालणारे हे खेळ बंद करण्यासाठी आपणही निवडणूक आयोगाबरोबर काही योगदान देऊ शकतो असे या मंडळींना का वाटत नाही ? हा खरा प्रश्न आहे.

जातपात धर्म,पक्ष पार्ट्या यांची मतदानासाठी सांगड घातली जातेच पण पैशाच्या बळावर कोणता भाग आम्ही पॅक केला याची निवडणूक काळात राजरोस चर्चा केली जाते.मात्र काही उच्चभ्रु एरवी खऱ्या लोकशाहीच्या गप्पा मारतात मात्र निवडणुकीला जोडून सुटीची वाट पाहत बसतात व आपली सुट्टी साजरी करण्यासाठी सरळ सहल अथवा पर्यटन करण्यासाठी निघून जातात,वर आल्यावर “नेते नालायक” म्हणायला तोंड वेंगाडून मोकळे असतात.काही शिक्षक,प्राध्यापक कॉलनीत रात्री दोन-दोन वाजे पर्यंत आपल्या वाट्याच्या नोटा आल्या का नाही यासाठी आपले दरवाजे सताड उघडे ठेऊन असतात.खरे तर निवडणूक प्रक्रिया अधिक सुटसुटीत करणे व तिचे शुद्धीकरण करण्यासाठी हे घटक का योगदान देत नाही.रात्रीचे चालणारे खेळ बंद करण्यासाठी आपणही निवडणूक आयोगाबरोबर काही योगदान देऊ शकतो असे या मंडळींना का वाटत नाही ? हा खरा प्रश्न आहे.या देशातील मतदारांनी जर जागरूक राहून आपले कर्त्यव्य बजावले तर या देशात अशक्य काहीच नाही.एक वेळ स्वच्छतेची अशक्य वाटणारी चळवळ आज शक्य झाली आहे.या प्रमाणेच निवडणुका या भयमुक्त व अर्थविरहित झाल्या तर खऱ्या अर्थाने निवडणूक साक्षरता येईल.व आपण चारित्र्यवान नेते निवडून आणू तो लोकशाहीसाठी सुदिन ठरेल.

कोपरगावात साधारण तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.प्रस्थापित माजी आ.कोल्हे यांचा गट,माजी आ. अशोक काळे यांचा पारंपरिक हाडवैर (?) असलेला दुसरा गट.या दोन्हीच्या राजकीय झुंजी तालुक्याने अनेकवेळा पाहिल्या आहेत.यात विदर्भातील रेड्यांच्या दिवसभर चालणाऱ्या लाढाईसारखे कोणीच जिंकत ही नाही आणि हारतही नाही.जिंकणारा हरलेल्या नेत्याला व त्याच्या संस्थानाला संभाळून घेण्याचा पडद्यामागचा अलिखित करार असल्यासारखे वागतात.त्यामुळे या नेत्यांच्या मागे आपले जीवन ओवाळून टाकणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आयुष्याची माती होते हे यांच्या लक्षातही येत नाही.उभे आयुष्य टाचा घासून बिचारे जन्माला आल्या पावलीच कुठल्याही पदाविनाच इहलोकीची यात्रा सहजच समोरून परागंदा होतात.

आता कोपरगाव विधानसभा निवडणुकीचे पाहू.कोपरगावात साधारण तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.प्रस्थापित माजी आ.कोल्हे यांचा गट,माजी आ. अशोक काळे यांचा पारंपरिक हाडवैर (?) असलेला दुसरा गट.या दोन्हीच्या राजकीय झुंजी तालुक्याने अनेकवेळा पाहिल्या आहेत.यात विदर्भातील रेड्यांच्या दिवसभर चालणाऱ्या लाढाईसारखे कोणीच जिंकत ही नाही आणि हरतही नाही.जिंकणारा हरलेल्या नेत्याला व त्याच्या संस्थानाला संभाळून घेण्याचा पडद्यामागचा अलिखित करार असल्यासारखे वागतात.त्यामुळे या नेत्यांच्या मागे आपले जीवन ओवाळून टाकणाऱ्या कार्यकर्त्यांच्या आयुष्याची माती होते हे यांच्या लक्षातही येत नाही.उभे आयुष्य टाचा घासून बिचारे जन्माला आल्या पावलीच कुठल्याही पदाविनाच इहलोकीची यात्रा सहजच समोरून परागंदा होतात.हा अनेक दशकांचा इतिहास बनून समोर उभा आहे.शेती सिंचनाचे पाणी,पिण्याचे पाणी,हाताला रोजगार,चालायला रस्ते.फिरायला राज्य परिवहन मंडळाचा पास, आरोग्यासाठी आर्थिक तरतूद,मुलांचे उच्च शिक्षण,उपवर मुलीचे लग्न,राहायला चार भिंतीचे घर आदी स्वप्ने हि स्वप्नेच राहून जातात.दुसरीकडे नेत्यांचे इमले आणि बंगले अवघ्या पाच वर्षात आकाशाला गवसणी घालायला जातात.उंची गाड्या,उंची कपडे,आकाशाला गवसणी घालणाऱ्या यांच्या इमारती,सेवेसाठी राबत असलेला नोकर-चाकर यांचा राबता.साधारण मतदाराला आपण उगीच या जन्मात हेलपाट्याला आलो असल्याचे उगीच वाटून जाते.यांची गाडीत जीभ बाहेर काढून उंची वातानुकूलित गाडीत हिंडणारी कुत्री तुटक्या पण सामान्य माणसाला खिजवत असल्याचे उगीच वाटून जाते.कोपरगाव तालुका या चाकोरीत बरोबर बसतो असे म्हटले तर वावगे वाटून घेऊ नये.

पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांचे इमले आणि बंगले अवघ्या पाच वर्षात आकाशाला गवसणी घालायला जातात.उंची गाड्या,उंची कपडे,आकाशाला गवसणी घालणाऱ्या यांच्या इमारती,सेवेसाठी राबत असलेला नोकर-चाकर यांचा राबता.साधारण मतदाराला आपण उगीच या जन्मात हेलपाट्याला आलो असल्याचे उगीच वाटून जाते.यांची गाडीत जीभ बाहेर काढून उंची वातानुकूलित गाडीत हिंडणारी कुत्री तुटक्या पण सामान्य माणसाला खिजवत असल्याचे उगीच वाटून जाते.

आता हेच पाहाना कोपरगाव तालुक्यात एरवी गाडीची काच उघडून कधी सामान्य माणसाला नमस्कार ना करणारी मंडळी तालुक्यात पायाला भिंगरी लावून फिरताना दिसत असून कधी कार्यकर्त्यांना सन्मानाने बोलावून कधी संघटन वाढविण्यासाठी साधा भेळ-चिवडा न देणाऱ्यांना आता विधानसभेची स्वप्ने पडू लागताच त्यांना कार्यकर्त्यांची आवर्जून आठवण आली आहे.व गावोगावी,गल्लोगल्ली,घरोघरी यांच्या उंची गाड्या फिरू लागल्या आहेत.तर काहींना अण्णांचे 1999 चे स्वप्न आता आठवून त्याच्या पूर्तीसाठी हाती पायताण घेतले आहे.हा काय चमत्कार आहे याचे कार्यकर्त्यांना आक्रीत वाटत असून या मागचे इंगित काय? या विचाराने यांचे डोके भणभनू लागले आहे.वास्तविक या नेत्याने कधीच विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आपली वाटचाल केलेली नाही.मग आत्ताच यांना निवडणुकीची उबळ का आली ? याचा अनेकांना थांगपत्ता लागत नव्हता.आमच्या प्रतिनिधीने या बाबत पाठपुरावा केला असता विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उत्तरेतील मामांना दक्षिण क्षेत्री निवडून आलेल्या भाच्याने शब्द दिला आहे.व कोपरगावी नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार विजय वहाडणे जर बिगर पैशाची निवडणूक लढवून विजयी होऊ शकतात तर तुम्हाला काय अडचण ? अशी उभारी दिली आहे.मी तुम्हाला रसद पुरवतो.असा आच्छाखांसा शब्द मिळाल्याचे वृत्त असून यात दक्षिणेत सुभेदारी करणाऱ्या या भाचेबुवांच्या पिताश्रीनी पश्चिम गडावरील राष्ट्रवादीच्या नेत्याला शब्द दिल्याने घोळ झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार उत्तरेतील मामांना दक्षिणक्षेत्री सुभेदारीवर निवडून आलेल्या भाच्याने शब्द दिला आहे.व कोपरगावी नगरपरिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार विजय वहाडणे जर बिगर पैशाची निवडणूक लढवून विजयी होऊ शकतात तर मामा तुम्हाला काय अडचण ? अशी उभारी दिली आहे.मी तुम्हाला रसद पुरवतो.असा आच्छाखांसा शब्द मिळाल्याचे वृत्त असून यात दक्षिणेत सुभेदारी करणाऱ्या या भाचेबुवांच्या पिताश्रीनी पश्चिम गडावरील राष्ट्रवादीच्या नेत्याला शब्द दिल्याने घोळ झाला आहे.

आता वाचकांना प्रश्न पडला असेल कि,एकाच म्याण्यात दोन तलवारी चालणार कशा ? तर यात दोन डाव सहज कळून आल्याशिवाय राहत नाही.यात उमेदवारी मिळाली तर ठीक नाहीतर आपली क्रय शक्ती (बार्गेनिंग पॉवर)वाढवून आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या जागा पश्चिम गडावरून वाढवून घ्यायच्या हि एक बाब तर दुसरी आपला पांढरा शुभ्र गोदागड शाबुद ठेवण्यासाठी पांढरी संजीवनी गुंडाळायला लावणे.हा दुसरा उद्देश दिसत आहे.कारण मागील या दोन्ही बुरुजांच्या ताब्यावरून बरेच रणकंदन होऊन वर्तमान लोकप्रतिनिधी 2015 मध्ये महानंद मध्ये गेल्यावर संजीवनी आंतर राज्यीय संघ असल्याचा निर्वाळा दिला गेला आहे.

प्राप्त माहिती नुसार सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीत खिंडीत गाठवून आपल्या मार्गातील संजीवनीचा काटा काढण्याचा डाव शिजत असल्याचे विश्वसनीय वृत्त असून सत्ताधाऱ्यांना मदतीच्या मोबदल्यात आपली पोळी भाजून घेतली जाणार आहे.या शिवाय अण्णांच्या काळात या गोदागडाला कारखान्याच्या शेजारी दहा आर क्षेत्र देण्याचे ईशान्य गडाच्या गडपतींनी कबुल केल्याची शिळी कढी वर आणली गेली असून ती पकवली जाणार आहे.

त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीत खिंडीत गाठवून आपल्या मार्गातील संजीवनीचा काटा काढण्याचा डाव शिजत असल्याचे विश्वसनीय वृत्त असून सत्ताधाऱ्यांना मदतीच्या मोबदल्यात आपली पोळी भाजून घेतली जाणार आहे.या शिवाय अण्णांच्या काळात या गोदागडाला कारखान्याच्या शेजारी दहा आर क्षेत्र देण्याचे ईशान्य गडाच्या गडपतींनी कबुल केल्याची शिळी कढी वर आणली गेली असून ती पकवली जाणार आहे.या सर्व अटी-शर्ती मान्य झाल्या तर तलवार म्यान करायची व न झाल्यातर त्यांना खिंडीत गाठायचे असे दुहेरी डावपेच शिजले गेले आहे.म्हणजे कसेही केले तरी गोदागडाचे दहाही बोटे तुपात राहतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे.आता याला कोण कसे डावपेच आखून कसे उत्तर देतो हे लवकरच कळणार आहे.कारण राजकारण हि शेवटी जरतरची कला आहे.जो त्यात तरबेज तो त्यातून आपल्या पदरात जास्तीचे पळवून नेतो हे सांगण्यासाठी कोना ज्योतिषाची गरज नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close