जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील “त्या”अविश्वास ठरावावर उद्या विशेष सभा

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या जवळके ग्रामपंचायतीचे सरपंच बाबुराव कारभारी थोरात यांचेवर सात पैकी सहा सदस्यांनी अविश्वास ठराव तहसीलदार कोपरगाव यांचेकडे दाखल असून ऊद्या सोमवार दि.१२ एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता त्या बाबत तहसीलदारांनी जवळके ग्रामपंचायतीत यासाठी ग्रामपंचयात सदस्यांची सभा आयोजित केली आहे.जिल्ह्यात म्हैसगाव नंतर दुसरा ठराव दाखल झाल्याने त्याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.

नगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील लोकनियुक्त सरपंचाविरुद्ध पहिला अविश्वास दाखल झाल्यानंतर हा दुसरा अविश्वास ठराव दाखल झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.या पूर्वी राज्यात असे वीसहुन अधिक ग्रामपंचायतीत असे ठराव संमत झाले आहे.

कोपरगाव तालुक्यातील जवळके ग्रामपंचायतीची निवडणूक डिसेंम्बर २०१६ मध्ये संपन्न झाली होती.त्यावेळी राज्यात भाजप सरकार सत्तेत असल्याने त्यांनी जनतेतून सरपंच निवडणूक घेण्याचे जाहीर केले होते.त्या प्रमाणे या निवडणुकीत तिरंगी लढतीत राष्ट्रवादीचे (आ.काळे गटाचे) सरपंच पदाचे उमेदवार बाबुराव थोरात यांना भाजप,परजणे तीन गटांनी एकत्र येऊन हि निवडणूक स्थानिक सत्यशोधक गटाविरुद्ध लढवली होती.त्यात मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा थोरात यांना मिळाला होता.व त्यात ते निवडून आले होते.व त्यांच्या सोबत विविध गटांचे अन्य चार सदस्य निवडून आले होते.तर स्थानिक सत्यशोधक या वैचारिक गटाचे बिन पैशाचे मतदारांनी निधी संकलन करून तीन सदस्य निवडून दिले होते.मात्र गत तीन वर्षात गावात नागरिकांच्या प्राथमिक गरजांची पुर्ती हा सत्ताधारी गट करू शकला नव्हता.व गावात एकही ठळक काम सरपंच थोरात यांना करता आले नव्हते.ग्रामस्थांची पायाभूत गरज या पदाधिकाऱ्यास पुरवता आली नाही त्यामुळे या गटातील तीन सदस्य नाराज होते त्यांनी याबाबत अनेक वेळा वरिष्ठ नेत्यांकडे नाराजी बोलून दाखवूनही उपयोग झाला नव्हता त्यामुळे याबाबत माजी सरपंच बंडोपंत थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी या गटाला धक्का दिला आहे.त्यांना भाजपचा एक सदस्याने साथ दिली आहे.त्यामुळे हा अविश्वास दाखल झाल्याचे बोलले जात आहे.जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील लोकनियुक्त सरपंचाविरुद्ध पहिला अविश्वास दाखल झाल्यानंतर हा दुसरा अविश्वास ठराव दाखल झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.या पूर्वी राज्यात असे वीसहुन अधिक ग्रामपंचायतीत असे ठराव संमत झाले आहे.त्यामुळे आता नगर जिल्हाधिकारी यांनी याबाबत उद्या या सदस्यांची विशेष सभा आयोजित केली आहे.यात काय होणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

या अविश्वास ठरावावर सत्ताधारी गटाचे ग्रामपंचायत सदस्य गणेश भास्कर थोरात,कविता खंडू थोरात,उपसरपंच मंदा सुधाकर थोरात,यांचेसह स्थानिक सत्यशोधक पॅनलचे प्रकाश गोरक्षनाथ थोरात,विजय साहेबराव थोरात,श्रीमती मालती अनिल थोरात आदीं सहा सदस्यांनी पाठिंबा दिला असून त्या ठरावावर त्यांच्या सह्या आहेत.आज तहसीलदार नियुक्त अधिकारी या बाबत हजर राहणार असून या वेळी मोठा चोख पोलीस बंदोबस्त पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे देणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close