गुन्हे विषयक
फायरिंगमुळे घराला तडे,कोपरगाव तहसीलदारांकडे तक्रार
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील काकडी ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या सुभाष भास्कर सोनवणे यांच्या गट क्रं.३३८ मध्ये शेततळ्याचे काम सुरु असून त्या ठिकाणी फायरिंगचा अनिर्बंध वापर होत असल्याने आपल्या राहात्या घराला तडे गेले असून ते काम तातडीने बंद करावे अशी मागणी तक्रारदार लुक्कास भास्कर सोनवणे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांचेकडे केली आहे.त्यामुळे काकडी परिसरात खळबळ उडाली आहे.
“काकडी हद्दीत ग.क्रं.३३८ हा शेतमालक सुभाष भास्कर सोनवणे यांच्या मालकीचा आहे.त्या ठिकाणी शेतमालक यांनी शेततळ्याचे काम सुरु केले आहे.त्या ठिकाणी त्या कामासाठी त्यांनी फायरिंगचा वापर सुरु केला आहे.त्या कामाचे स्फोट झाल्यावर त्याचे दगड थेट आपल्या घरावर येत असून त्यामुळे आपले सौर ऊर्जेचे सयंत्र फुटले आहे.व घराला तडे गेले आहे”-लुक्कास सोनवणे,तक्रारदार.
काकडी ग्रापंचायत हद्दीत गावाच्या पश्चिमेस तक्रारदार लुक्कास सोनवणे हे आपल्या जागेत घराचे पक्के बांधकाम करून आपल्या कुटुंबासोबत राहतात.त्यांच्या शेजारीच ग.क्रं.३३८ हा शेतमालक सुभाष भास्कर सोनवणे यांच्या मालकीचा आहे.त्या ठिकाणी शेतमालक यांनी शेततळ्याचे काम सुरु केले आहे.त्या ठिकाणी त्या कामासाठी त्यांनी फायरिंगचा वापर सुरु केला आहे.त्या कामाचे स्फोट झाल्यावर त्याचे दगड थेट आपल्या घरावर येत असून त्यामुळे आपले सौर ऊर्जेचे सयंत्र फुटले आहे.व घराला तडे गेले असल्याची तक्रार लुक्कास सोनवणे यांनी केली आहे.या खेरीज शेडवर दगडे येऊन पडत आहे.या बाबत आपण ग्रामपंचायत येथे तक्रार केली असता ग्रामसेवक यांनी त्यांना समज देऊनही उपयोग झाला नाही त्यानी दि.७ मार्च रोजी पुन्हा फायरिंग करून पुन्हा आपल्याला धक्का दिला आहे.त्यामुळे आपल्या घराचे नुकसान झाले आहे.त्यासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर स्फोटक आणलेले आहे.तरी हे काम तातडीने बंद करावे अशी मागणी त्यांनी शेवटी केली आहे.आता या बाबत तहसीलदार काय कारवाई करणार याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.तक्रारदार व शेततळ्याचे काम करणारा शेतकरी हे भाऊ-भाऊ आहेत.