जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

पोलिसांची डोकेदुखी ठरलेले चोरटे अखेर गजाआड,०५ लाखांचा ऐवज जप्त 

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

   कोपरगाव शहरात चोऱ्यांचा हैदोस घालणाऱ्या शुभम भागवत शिर्के (वय-२४)रा.ब्रिजलालनगर,महेश मोहन सोनवणे (वय-१९) रा.बेट कोपरगाव,ओंकार नितीन नागरे (वय २१)रा.अंबिकानगर आदी तीन सराईत चोरट्यांना कोपरगाव शहर पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून विविध गुंह्यातील सुमारे ०५ लाख ०२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला असून त्यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात जवळपास पाच गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे.

दरम्यान या तीन आरोपीना कोपरगाव येथील न्यायालयासमोर हजर केले असता प्रथम त्यांना पाच दिवसांचा पोलीस कोठडी मागितली असता कोपरगाव येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.तर आज सदर कोठडी संपल्यावर त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची कोठडी शहर पोलिसांनी मागितली असता त्यांना दिवसाची कोठडी सुनावली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,”कोपरगाव शहर आणि तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण बेसुमार वाढले होते.उन्हाळ्यात सह्याद्री कॉलनीत लेखा परीक्षक दत्ता खेमनर यांची स्विफ्ट डिझायर,निवारा परिसरात डॉ.जगदीश झंवर व साईनगर परिसरात अड्.मनोज कडू यांच्या दोन मारुती एर्टीगा या तीन किमती कार एकाच रात्री लंपास केल्या होत्या.या शिवाय निवारा परिसरात एक सुमारे दोन लाखांची चोरी झाली होती.या शिवाय कोपरगाव बस स्थानक व अन्य नागरिकांना रात्री व पहाटेच्या वेळी फिरण्याच्या मार्गावरील चैन ओरबडण्याच्या व सोन्याचे दागिने पळविण्याचा घटनांची गणतीच नव्हती.त्यामुळे पोलिसांचा धाक राहिला का ? असा सवाल नागरिकांच्या मनात निर्माण झाला होता.त्यामुळे या चोऱ्या वरचेवर वाढत चालल्या होत्या.याला आळा घालणे गरजेचे असताना त्यावर कुठलीही कार्यवाही होताना दिसत नाही.सर्वच आघाड्यावर सामसुम दिसत होती.तालुक्यातील गुन्ह्याची वेगळी स्थिती नाही.त्यामुळे सामान्य नागरिकांना आपला जीव मुठीत धरून जगण्याची वेळ आली होती.पोलीस अधिकारी हैराण झाले होते.अशातच एक समाधानकारक बातमी हाती आली असून शहर पोलिसांनी आपल्या हद्दीत दि.०५ ऑगष्ट रोजी फिर्यादी अजिंक्य लक्ष्मण कदम (वय-२७) नक्षत्र हाइट्स जुना टाकळी रोड यांची नुकतीच एक विविध दागिन्यासह रोख रक्कम अशी ७८ हजार रुपयांची चोरी झाली असताना त्यांनी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असताना व त्या संशयित आरोपींच्या पोलीस शोधात असताना त्यांना एक अकल्पित चोरट्याची बातमी मिळाली होती.त्यानुसार कोपरगाव शहर पोलिसांनी वरील आरोपी शुभम भागवत,महेश सोनवणे,ओंकार नागरे यांना अटक करून त्यांना आपला पोलिसी हिसका दाखवला असता त्यांनी आपल्या १३ गुन्ह्याची कबुली दिली आहे.चोरटे अटक केल्याची बातमी आमच्या प्रतिनिधीने प्रसिद्ध केली होती.मात्र पोलिसांनी अधिकृत माहिती प्रकाशित केली नव्हती.ती आज उपलब्ध झाली आहे.

दरम्यान सदर चोरटे दूध घालण्याच्या निमित्ताने घराची टेहळणी करून या चोऱ्या करत असल्याचे उघड झाले आहे.त्यातील एक स्वतंत्रपणे घरांची रेकी करत होता अशी माहिती पोलीस अधिकारी प्रदीप देशमुख यांनी दिली आहे.

   दरम्यान या चोरट्यांकडून जप्त केलेल्या ऐवजात ०२ लाख रुपये किमतीची यामाहा दुचाकी,७५ हजारांची बजाज प्लॅटिना,(क्रं.एम.एच.१७ ए.बी.५७७१)८५ हजारांची बजाज प्लॅटिना (क्रं.एम.एच.१७ सी.एल.०८६४),०४ हजार रुपये किमतीची चांदी,त्यात तीन शिक्के,दोन अंगठ्या,एक दिवा,०७ हजार रुपये किमतीच्या काळ्या रंगाचा एम.आय.कंपनीचा रेड मी,नोट-४ कंपनीचा मोबाईल,१० हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा एफ.११ मॉडेल निळ्या रंगाचा मोबाईल,१० हजार रुपये किंमतीचा सॅमसंग कंपनीचा आकाशी रंगाचा एम-३२ मॉडेल मोबाईल,१५ हजार रुपये किंमतीचा अप्पल कंपनीचा सफेद रंगाचा मोबाईल,०५ हजार रूपये किमतीचा सॅमसंग कंपनीचा आकाशी रंगाचा जे.६ मॉडेल मोबाईल,०५ हजार किंमतीचा लाव्हा कंपनीचा सिल्व्हर रंगाचा मोबाईल,४५ हजार किमतीची १५ ग्रॅम वजनाची सोन्याची लगड,३० हजार किमतीची सोन्याची लगड,२१ हजार किमतीची सोन्याची लगड, आदी एकूण ०५ लाख ०२ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला आहे.

दरम्यान या चोरट्याविरुद्ध अन्य ०५ गुन्हे दाखल झालेले असून त्यात गुन्हा क्रं.३७६/२०२३ भा.द.वि.कलम ३८०,३४ प्रमाणे,गुन्हा क्रं.३०७/२०२३ भा.द.वि.कलम ४५४,४५७,३८०,प्रमाणे,गुन्हा क्रं.२०८/२०२३ भा.द.वि.कलम ४५४,३८० प्रमाणे,गुन्हा क्रं.३८१/२०२३ भा.द.वि.कलम,३८० प्रमाणे,गुन्हा क्रं.४०५/२०२३ भा.द.वि.कलम,४५४,३८० प्रमाणे दाखल झालेले आहे.त्यामुळे पोलिसही चक्रावुंन गेले आहे.

दरम्यान या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे,भरत दाते,पोलीस हे.कॉ.डी.आर.तिकोणे,पोलीस नाईक बाबासाहेब कोरेकर,अर्जुन दारकुंडे,पोलीस कॉ.जालिंदर तमनर,संभाजी शिंदे,ज्ञानेश्वर भांगरे,महेश फड,विलास मासाळ,यमनाजी सुंबे,तुषार कानवडे,बाळू घोंगडे,गणेश काकडे,राम खारतोडे,आदींनी आपला सहभाग नोंदवला आहे.या पोलीस अधीकारी आणि कर्मचाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.दरम्यान आणखी किती गुन्हे या चोरट्यांकडून निष्पन्न होणार याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.


दरम्यान ताज्या माहिती नुसार पोलिसांनी आरोपीना कोपरगाव येथील न्यायालयासमोर हजर केले असता प्रथम त्यांना पाच दिवसांचा पोलीस कोठडी मागितली असता कोपरगाव येथील मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती.तर आज सदर कोठडी संपल्यावर त्यांना आज न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना पाच दिवसांची कोठडी शहर पोलिसांनी मागितली असता त्यांना दिवसाची कोठडी सुनावली आहे.त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.उर्वरित गुन्ह्याची उकल होईल अशी आशा व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close