कोपरगाव तालुका
कोपरगाव तालुक्यातील सहकारी कारखानदारीचे खाजगीकरण कधी झाले ते जाहीर करा-जाधव
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील दोन्ही सहकारी साखर कारखानदार एकाच दिवशी आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभा घेऊन सभासदांना आपल्या उपस्थितीपासून वंचित ठेऊन त्यांच्यावर बिनबोभाट अन्याय करत आहे त्यांना हा अधिकार कोणी दिला कि त्यांनी आपल्या साखर कारखान्याचे खाजगीकरण केले आहे असा तिरकस सवाल भाजपचे माजी तालुकाध्यक्ष नामदेवराव जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये विचारला आहे.
त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे कि,कोपरगाव तालुक्यातील दोनही सहकारी ? साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभा नुकत्याच एकाच तारखेला,एकाच वेळेला उरकण्यात आल्या.शेतकरी सभासदांच्या भाग भांडवलावर उभ्या राहिलेल्या या संस्था सहकारी आहेत कि खाजगी ? नामकरण तर केंव्हाच पार पडले,आता सहकार सम्राटांनी संकोच न धरता अधिकृतपणे
खाजगीकरण करून टाकावे.ते सहकाराचे केवळ नाटक कशासाठी करतात.खरे तर या परिवारांचे आडनाव वेगवेगळे असले तरी सरंजामी प्रवृत्ती एकच आहे.
कोपरगाव तालुक्यातील दोनही सहकारी ? साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभा नुकत्याच एकाच तारखेला,एकाच वेळेला उरकण्यात आल्या.शेतकरी सभासदांच्या भाग भांडवलावर उभ्या राहिलेल्या या संस्था सहकारी आहेत कि खाजगी ? नामकरण तर केंव्हाच पार पडले,आता सहकार सम्राटांनी संकोच न धरता अधिकृतपणे खाजगीकरण करून टाकावे.ते सहकाराचे केवळ नाटक कशासाठी करतात.
अनेक शेतकरी-ऊस उत्पादक दोनही कारखान्यांचे सभासद असतांनाही सहकारातील धटिंगणशाहीने सहकार कायदे-नियम-प्रथा पायदळी तुडवून मनमानी केली आहे.सभासदांना आपले मत प्रदर्शित करण्याची संधी न देण्याचे कारण काय ? कारभारात अनेक भानगडी,अनियमितता,घोळ असल्यामुळेच तथाकथित सम्राट सामान्य सभासदांना घाबरलेले दिसतात.सभासदांची मुस्कटदाबी करणाऱ्या नेत्यांना सभासद धडा शिकविल्याशिवाय रहाणार नाहीत.आर्थिक नाड्या तुमच्या ताब्यात आहेत म्हणून रुबाब दाखवू नका.सत्तेची मस्ती दाखविणाऱ्या नेत्यांच्या अनेक भानगडी येत्या काळात उघडकीस येणार आहेत.
सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुका बिनविरोध करता,सर्वसाधारण सभा एकाच तारखेला भरवता,ऊसाचा भाव एकमताने ठरवता.इतकेच नाही तर सर्वसाधारण सभेत मिठाईचे पॅकेटसुद्धा “चितळे” चेच वाटता. तिथेही तुम्हाला कमीशन आहे कि काय? पण ग्रामपंचायत, पंचायत समिती,जिल्हा परिषद,नगरपरिषद, विधानसभा निवडणुकात मात्र गावोगावच्या कार्यकर्त्यांत झुंज लावून आपापल्या टोळ्या जपण्याचे राजकारण किती दिवस करणार.सहकारातून लुटलेल्या अमाप पैशांच्या जोरावर सभासदांवरच दहशत गाजविणाऱ्या नेत्यांना शेतकरी सभासद जाब विचारत नाही याचा अर्थ सारेच आलबेल आहे हा गैरसमज काढून टाका.शेतकऱ्यांच्या असंतोषाचा स्फोट लवकरच होणार आहे.निवडणुक तोंडावर आली असतांना उदघाटन, भूमिपूजन, स्पर्धा,वर्गण्या, देणग्या असे कार्यक्रम करून जनतेच्या डोळ्यात धुळफेक करू नका.तालुक्याचे हक्काचे पाणी कुणी घालवले आधी याचे उत्तर द्या.असे आव्हानही नामदेवराव जाधव यांनी शेवटी प्रस्थापितांना दिले आहे.