कोपरगाव तालुका
कोपरगावात एकवीस तारखेला हिंदी दिवस समारंभ होणार
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील राष्ट्रभाषा सेवा मंच व स्व.र. म. परिख सार्वजनिक वाचनालय के.जे.सोमय्या महाविद्यालय व जेष्ठ नागरिक सेवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि.एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता सोमय्या महाविद्यालयातील साखरबेन सभागृहात संपन्न होणार असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक रोहमारे हे राहणार आहे.
या कार्यक्रमास प्रमुख वक्ते मध्यप्रदेश देवास येथिल प्रसिद्ध कवी बहादूर पटेल हे राहणार आहेत.या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव,सेवा मंचचे अध्यक्ष पद्मकांत कुदळे,नंदकिशोर परदेशी,सुरेश गोरे,शोभना ठोळे,जेष्ठ नागरिक सेवा मंचचे अध्यक्ष छोटुभाई जोबनपुत्रा,उपाध्यक्ष दत्तात्रय कंगले, विजय बंब,रजनीताई गुजराथी,सुधाभाभी ठोळे,डॉ.जे.एस.मोरे,डॉ.बी.एस.भुजाडे,डॉ.एस.बी.दवंगे, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.