जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

महावितरणचा कुक्कुटपालक शेतकऱ्यांकडून सुलतानी वसुलीसाठी न्यायालयाचा वापर!

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील दुष्काळी भागातील कुक्कुट पालक शेतकऱ्यांचे शेड बंद होऊन दहा-बारा वर्ष उलटूनही व मीटर केंव्हाच काढून नेऊन किंवा बंद होऊनही महावितरण कंपनीने या शेतकऱ्यांकडून साडेतीन लाखांपासून ते आठ लाख चोपन्न हजार रुपयांपर्यंत पठाणी वसुली करण्याचा नवीन फंडा शोधून काढला असून जिल्हा लोकन्यायालयाचा धाक दाखवून व ऐनवेळी आपल्या तारतंत्री कडून नोटिसा धाडून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा धंदा नुकताच उघड झाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि, कोपरगाव तालुक्यासह उत्तर नगर जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा अभाव आहे,परिणामस्वरूप शेतकऱ्यांना निव्वळ शेती व्यवसायावर अवलंबून राहता येत नाही त्यासाठी ते साधारण 2000 सालानंतर दुग्ध व्यवसायाकडे व त्यांनतर कुक्कुट पालन व्यवसायाकडे वळले.त्यामुळे या भागात कुक्कुट व्यावसायिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली त्याचा सुरुवातीच्या काळात त्यांना चांगला आर्थिक हातभारही लागला मात्र या व्यवसायात जसजशी स्पर्धा वाढत गेली तसतशी पक्षी पुरविणाऱ्या अनियंत्रित कंपन्या व त्यांचे हस्तक यांनी शेतकऱ्यांचा नफा लुटण्यास प्रारंभ केला व थोड्याच दिवसात हा व्यवसाय या घटकांनी देशोधडीला मिळवला.आता या व्यवसायात पक्षी लहान असताना विजेची प्रामुख्याने गरज असते.त्या साठी कृषिपुरक व्यवसाय म्हणून त्यावेळच्या महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाने विद्युत जोडण्या घेण्यासाठी सवलती दिल्या.मात्र नंतर मात्र त्या टप्प्या-टप्याने काढून घेतल्या.शेतकऱ्यांनी राज्यात कोंबड्याना बर्ड फ्लू आल्या नंतर त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.व शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले.त्यांनतर बऱ्याच शेतकऱ्यांनी हा व्यवसाय बंद केला.वास्तविक ज्यांनी हा व्यवसाय बंद केला त्यांनी तीन माहिन्यानी महावितरण कंपनीस कळवून आपले मीटर बंद करणे गरजेचे होते.मात्र एवढी सजगता आपल्या शेतकऱ्यात दुर्दैवाने नाही.अशा वेळी महावितरण कंपनीने सलग तीन महिने एखाद्या शेतकऱ्याने वीजबिल भरले नाही या कारणास्तव ते कायमस्वरूपी खंडित करावयास हवे होते मात्र कंपनीने मात्र असे केलेले नाही उलट आपले मीटर तेथेच ठेऊन व नंतर नादुरुस्त दाखवून शेतकऱ्याकडून सरासरी विजबिलाची पठाणी वसुली सुरूच ठेवली.त्याला दंड व व्याजाची आकारणी करून आपण लोकशाहीत काम करतो याचाच त्यांना विसर पडून त्यांनी पठाणी वसुली सुरूच ठेवली ती किती असावी याचा कुठलाही धरबंध ठेवलेला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांवरील बोजा वाढत जाऊन एकाएकी लाखों रूपयांच्या नोटिसा पाठवल्या त्यामुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे.

महावितरण कंपनीने कोपरगाव तालुक्यातील कुक्कुट पालकांना चुकीची बिले देऊन,तर कधी मीटर नादुरुस्त दाखवून,कधी जोडणी खंडित करूनही लाखो रुपयांची बिले देऊन त्याच्या वसुलीसाठी लोकन्यायालयाचा वापर करून लोकांना दहशतीत आणून त्यांचाकडून हि पठाणी वसुली करणे चुकीचे असल्याची प्रतिक्रिया कुक्कुट पालक शेतकरी अण्णासाहेब रहाणे यांनी व्यक्त केली आहे.व या बिलात सुधारणा न केल्यास नगर जिल्हा कुक्कुट पालक संघटना आंदोलन करील असा इशारा दिला आहे.

शेकडो रुपयांचे थकीत बिलाच्या रकमा काही लाखांत झाल्या आहेत.अंजनापूर येथील शेतकरी भाऊसाहेब गणपत गव्हाणे या शेतकऱ्यांवर अशीच आठ लाख चोपन्न हजाराची वसुली काढली गेली.ज्या वेळी दोन दिवस अगोदर या शेतकऱ्याला हे नोटीस आली त्यावेळी त्यांचे डोळे पांढरे होण्याचेच बाकी राहिले.कारण या शेतकऱ्याची पूर्ण संपत्ती विकूनही तो हि रक्कम भरू शकत नाही.जवळके येथील एका शेतकऱ्याला जेवढी बिलाची रक्कम तेवढिच दंड व व्याजाची रक्कम या नोटीसीत दिसत आहे.अशिच एक आदिवासी कुटुंबाची व्यथा समोर आली असून मुर्शतपुर येथे शेतमजुरी करून आपली गुजराण करणाऱ्या उत्तम भागीरथी निकम ह. मु.दत्तवाडी या आपल्या झोपडीवजा घराचे नियमित बिल भरत असताना केवळ एक बिल थकले असताना त्यांना प्रथम चार हजाराचे,नंतर आठ हजाराचे,व शेवटी चौदा हजारांचे बिल देऊन महावितरण कंपनीने आपल्या अकलेचे दिवाळे काढल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान हि बाब कोपरगाव येथील विधिज्ञ गौरव गुरसळ व जिल्हा कुक्कुट पालक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयाचे लक्षात आणून दिली असून त्यांनी या प्रकरणी तडजोड करायची किंवा नाही हे शेतकऱ्यांच्या मनावर असल्याचे सांगून त्यांना सदर बिलाची रक्कम मान्य नसेल तर ते न्यायालयाचा दरवाजा ठोठावू शकतात असे सांगितले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

त्याच बरोबर धारणगाव रोड कोपरगाव येथील निवासी महिला अलका संजय झालटे या नियमितपणे सरासरी माहिनाकाठी तीस युनिट वीज वापरणाऱ्या महिलेला मीटर नादुरुस्त दाखवून अठ्ठाविस हजार रुपयांचे बिल दिले, दहा हजार रुपये भरूनही अद्यापही तेवढीच रक्कम त्यांच्या नावावर थकबाकी दाखवून महावितरण कंपनीने चांगलाच शॉक दिला आहे.एवढ्यावर या कंपनीचे प्रताप थांबत नाही त्यांनी मयताच्या नावावरही वीजबिल पाठवून कहर उडवून दिला आहे.बहादरपूर येथील शेतकऱ्याचे साईनाथ नरहरी रहाणे ऐवजी शिवनाथ नरहरी रहाणे असे नोंदवून आपल्या अकलेची आणखी एक चुणूक दाखवून दिली आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close