जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

नसती लुडबुड करणाऱ्या नगरसेवकास कोपरगाव पोलिसांनी बदडले !

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव नगरपरिषद हद्दीत बुद्धीच्या देवतेला भावपूर्ण निरोप देऊन झाल्यावर थकल्या भागल्या पोलिसांना दुसऱ्या एका प्रकरणात राज्य परिवहन मंडळाच्या चालकास मारहाण केलेल्या आरोपीच्या प्रकरणात नशेत विनाकारण अरेरावी करून,लुडबुड करून त्रास दिल्या प्रकरणी रात्री साडे अकराच्या सुमारास कोपरगाव शहर पोलीस अधिकाऱ्यांनी सत्ताधारी पाण्याशी संबंधित माजी सभापती तथा नगरसेवकास आपला चांगलाच हिसका दाखवला असून दोन वेळेस बडवून काढल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्याने कोपरगाव शहरात खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे कि, अनंत चतुर्दशी असल्याने कोपरगाव शहरात गणपतींचे विसर्जन करण्याचे महत्वाचे कर्तव्य बजावण्याचे काम कोपरगाव शहर पोलीस व त्यांचे अधिकारी करत असताना ते कार्य त्यांनी अकरा वाजता शेवटचा गणपती बुडवून व्यवस्थित व कुठलेही गालबोट लागू देता पारही पाडले असताना दुसरीकडे रात्री साडे आठ वाजता दुसरी घटना घडत होती.राज्य परिवहन महामंडळाच्या मालेगाव बस आगाराची बस नगर मार्गे कोपरगाव आगारात घुसत असताना त्यातून उतरत असलेले आरोपी मनिंदरसिंग बहादूरसिंग भाटिया,रा.निवारा,पप्पु खाटीक रा. लक्ष्मीनगर,भिवड्या उर्फ अक्षय नाव माहित नाही,यानी बस मधील प्रवासी उतरत असतांना या तीन अनोळखी इसमांनी आमच्या मित्राला कट का मारला ? असे म्हणत लाथा बुक्य्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली.व जीवे मारण्याची धमकी दिली या प्रकरणी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल होत असताना पोलीस ठाण्यात थोडी गर्दी दिसत होती तथापि या दरम्यान या घटने बद्दल एका सत्ताधारी गटाच्या अति उत्साही नगरसेवकास कोणी तरी अज्ञात व्यक्तीने या बाबत खबर दिली. हे महाशय तातडीने शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले व अटक केलेल्या आरोपीशी कर्तव्यावरील पोलिसांनी हरकत घेतली असतानाही त्या आरोपीशी काहीबाही बोलत होते त्यास कर्तव्यावरील पोलीस अधिकाऱ्याने हरकत घेतल्यावर हे महाशय त्यांना उलट,”मला ओळखले का ? मी कोण आहे? मी सत्ताधारी गटाचा नगरसेवक आहे.असे म्हणून कर्तव्यावरील जेष्ठ पोलिसास दमबाजी सुरु केली त्यावर मग सांगून व समजावूनही हे महाशय ऐकत नाही म्हटल्यावर पोलिसाने आपली जी भाषा आरोपीला समजते त्या भाषेत दोन श्रीमुखात लगावल्या त्यावर या आदरणीय (?) व्यक्तीने ऐकले नाही.त्यामुळे अखेर संबंधित कर्मचाऱ्याने या गुन्ह्यात या नगरसेवकांचे नाव घालण्यास प्रारंभ केला तेवढ्यात तेथे एक पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारी आले व त्यांनी त्यास समजावून सांगितले मात्र महाशय ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते त्यांची पोलीस कर्मचाऱ्यांना अरेरावी सुरूच होती.त्याने अखेर आपला नगरपरिषद निवडणुकीत अध्यक्षपदासाठी उभे असलेले मात्र त्यात पराभूत झालेल्या नेत्याला भ्रमणध्वनी करून बोलावून घेतले त्यांनी आल्या आल्या पोलिसांवर तोफगोळे डागण्यास सुरुवात केली.कोणता कॉन्स्टेबल होता ? आमच्या कार्यकर्त्याला मारायला मोगलाई माजली का ? असा बराच कोलाहल व हलकल्लोळ केला.

दरम्यान तेथे जेष्ठ पोलीस अधिकारी आले त्यांनी या सर्वांना आपल्या केबिन मध्ये बोलावून सगळा मामला समजावून घेतला.त्या वेळीही हे आदरणीय आपले नाव या प्रकरणात विनाकारण गोवले असल्याचा कांगावा करत होते.त्यावेळी पुन्हा हे अति क्रियाशील नगरसेवक कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अरेरावी करून बोलू लागले मग काय पाहायचे ! उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी बाहेर अशोकाच्या झाडाजवळ मंदिरा समोर घेऊन पुन्हा एकदा लाठ्याकाठ्यांनी चांगलेच रिबिट केल्याने महोदय ठिकाणावर आले.

दरम्यान तेथे जेष्ठ पोलीस अधिकारी आले त्यांनी या सर्वांना आपल्या केबिन मध्ये बोलावून सगळा मामला समजावून घेतला.त्या वेळीही हे आदरणीय आपले नाव या प्रकरणात विनाकारण गोवले असल्याचा कांगावा करत होते.त्यावेळी पुन्हा हे अति क्रियाशील नगरसेवक कनिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अरेरावी करून बोलू लागले मग काय पाहायचे ! उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी बाहेर अशोकाच्या झाडाजवळ मंदिरा समोर घेऊन पुन्हा एकदा लाठ्याकाठ्यांनी चांगलेच रिबिट केल्याने महोदय ठिकाणावर आले.तो पर्यंत खबर ईशान्य गडावर जाऊन धडकली होती तेथून आपल्या सैनिकांवर हल्ला झाला म्हटल्यावर युवराज धावत-धावतच आले त्यांनी मग या प्रकरणी मध्यस्थी करून या बाबत तोडगा काढून या प्रकरणी दिलगिरी व्यक्त करून या खटल्यातून आपल्या शूरविराचे नाव वगळले असल्याची पक्की खबर मिळाली आहे.

दरम्यान आमच्या प्रतिनिधीने या प्रकरणी संबंधित नगरसेवकाशी सायंकाळी 7.55 वाजता संपर्क केला असता त्यांनी आपण एका कार्यक्रमात असून तुमच्याशी नंतर संपर्क करतो असे म्हणून एक तासाने संपर्क केला व धक्काबुक्की झाल्याचे कबूल केले आहे.व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गैरसमजूतीतून सदरचा प्रकार झाल्याची सारवासारव केली आहे.

या प्रकरणी विश्वसीय पोलीस सूत्रांनी दुजोरा दिला असून प्रत्यक्षदर्शींनी खबर पक्की असल्याचे सांगितले आहे. दरम्यान या प्रकरणी रात्री साडेबारा वाजेच्या दरम्यान सत्ताधारी गटाच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक आपल्या गुरुद्वारा मार्गावर झाली असून आज दुपारीही बराच उशिरा पर्यंत खल केल्याचे वृत्त आहे.दरम्यान या घटनेची सर्व शहरात चौकाचौकात चर्वितचर्वण सुरु असल्याचे आढळले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close