जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

ओव्हरफ्लोचे पाणी विकणाऱ्या आमदारांना  जनता जागा दाखवणार- काळे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीतून शंभरावर टी. एम. सी.पूरपाणी जायकवाडीकडे वाहून जात असतांना शेतकऱ्यांना केवळ बघत राहण्यापालिकडे काहीही करता आलेले नाही. कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना मात्र सात नंबर फॉर्म भरून विकत पाणी घ्यावे लागत असून शेतकऱ्यांना ते पाणी विकणाऱ्या तालुक्याच्या आमदारांना येणाऱ्या निवडणुकीत जनता त्यांची जागा दाखवणार असल्याचा विश्वास विश्वास कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील कार्यक्रमात बोलताना व्यक्त केला आहे.

कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथे जिल्हा परिषदेच्या शाळा खोलीचे उदघाटन व शालेय मुलींना दुचाकी वाटप कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

कोपरगाव तालुका पर्जन्य छायेचा असल्यामुळे नेहमीच कमी पाऊस पडतो. याहीवर्षी कोपरगाव तालुक्यात जेमतेम पाऊस झाल्यामुळे अद्याप विहिरींना पाणी उतरलेले नाही. परतीच्या पावसाच्या अपेक्षा असून जर परतीचा पाऊस चांगला झाला तर रब्बीच्या अपेक्षा वाढू शकतात परंतु तोपर्यंत शेतकऱ्यांच्या दृष्टीने परिस्थिती चिंताजनक आहे.

सदर प्रसंगी कारभारी आगवन, पंचायत समिती सभापती अनुसया होन, उपसभापती अनिल कदम, जी.प. सदस्या सोनाली साबळे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुधाकर रोहोम, पंचायत समिती सदस्य मधुकर टेके, पौर्णिमा जगधने, प्रभाकर मलिक, बाबासाहेब साळुंके, रोहिदास होन,सरपंच भागीरथीन मलिक, रंगनाथ मलिक, सांडूभाई पठाण, रामा मलिक, प्रकाश मलिक, शंकर सुंबे, दत्तु हेगडमल, चांगदेव मलिक, विष्णू सुंबे, दत्तु मरकड, मुख्याध्यापक सोळसे , गंगाधर साळुंके, दत्तात्रय मलिक, नारायण मलिक, नानासाहेब मलिक, सुनील मलिक, आसाराम मांडोडे, लक्ष्मण मलिक, तुकाराम भगुरे, देवराम हेगडमल, मल्हारी मलिक, कृष्णा मलिक, दादासाहेब साबळे, प्रसाद साबळे, दीपक रोहोम, सोपान काशीद, पंकज लोंढे, सागर चव्हाण, रविंद्र थोरात, राहुल जगधने, गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, विजय रक्ताटे, विजय थोरात, महेश लोंढे, सुदाम लोंढे, विजय पंढरीनाथ रक्ताटे, अशोक जगन्नाथ रक्ताटे, संजय देशमुख, संजय थोरात, आप्पासाहेब लोहकणे, राजेंद्र रोहोम आदी मान्यवर उपस्थित होते.
कोपरगाव तालुका पर्जन्य छायेचा असल्यामुळे नेहमीच कमी पाऊस पडतो. याहीवर्षी कोपरगाव तालुक्यात जेमतेम पाऊस झाल्यामुळे अद्याप विहिरींना पाणी उतरलेले नाही. परतीच्या पावसाच्या अपेक्षा असून जर परतीचा पाऊस चांगला झाला तर रब्बीच्या अपेक्षा वाढू शकतात परंतु तोपर्यंत शेतकऱ्यांच्या दृष्टीने परिस्थिती चिंताजनक आहे. जायकवाडी धरण १०० टक्के भरले असून आजही जायकवाडी धरणात ओव्हरफ्लोचे पाणी वाहून जात आहे व हेच ओव्हरफ्लोचे पाणी तालुक्याच्या कार्यसम्राट आमदारांमुळे लाभक्षेत्रातील शेतकरी विकत घेत आहे. हि अतिशय दुर्दैवाची गोष्ट असल्याची खंत काळे यांनी शेवटी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close