जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

शहर विकासासाठी योगदान माजी अध्यक्षांचा सन्मान गरजेचा-नगराध्यक्ष वहाडणे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव शहरासाठी योगदान देणाऱ्या माजी अध्यक्षांसह नगरसेवकांचा व त्यांच्या विचारांचा योग्य सन्मान राखणे हि काळाची गरज असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोपरंगाव येथे बोलताना केले आहे.

कोपरगाव शहराच्या दिवंगत माजी नगराध्यक्ष डॉ. के.ई. राठी, वामनराव शिलेदार, बाबुराव गवारे, वसंतराव सातभाई, बबनराव वाजे यांच्या दुसऱ्या टप्प्यातील प्रतिमांचे अनावरण नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या दालनांत लावण्याचा कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला त्यावेळी ते बोलत होते.

सदर कार्यक्रमास उपनगराध्यक्ष योगेश बागुल,माजी नगराध्यक्ष संजय सातभाई,ऐश्वर्या सातभाई,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वरपे,राष्ट्रवादीचे गटनेते विरेन बोरावके,नगरसेवक सत्येन मुंदडा,बाळासाहेब आढाव,कैलास जाधव,राजेंद्र गिरामे,सुनील शिलेदार,शरद गवारे,दिलीप अजमेरे,डॉ.जयंत राठी,डॉ,हेमंत राठी,बबलू वाणी,उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे, माजी अध्यक्षांच्या परिवारांचे सदस्य,मित्र,आप्तेष्ट व शहरातील प्रतिष्ठित बहुसंख्येने उपस्थित होते.

त्या वेळी पुढे बोलतांना ते म्हणाले कि, या शहरासाठी योगदान असणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान करून भावी पिढीपुढे त्यांचा आदर्श रहाणे अत्यंत गरजेचे आहे. राजकारण हे निवडणुकीपूरतेच असावे.शहर विकासासाठी सर्वानीच पक्षीय मतभेद बाजूला ठेवून काम केले तरच शहरविकास वेगाने होऊ शकतो.अडथळ्यांचे राजकारण करणाऱ्यांना भावी पिढी माफ करणार नाही.व्यक्तीचे वैयक्तिक मतभेद सार्वजनिक जीवनात अडथळा ठरू नयेत.माजी कर्तृत्ववान लोकप्रतिनिधीच्या कार्याच्या स्मृती आपण प्रतिमा लावून जपणे आवश्यक आहे.पण त्यांच्या विचारांचे अनुसरण करणे गरजेचे आहे.पालिकेत आपण निपक्ष पद्धतीने जनसेवा करत असून आगामी काळातही ती करत राहू असे आश्वासनही त्यांनी उपस्थितांना शेवटी दिले आहे.

त्यावेळी नेत्र रोग तज्ज्ञ डॉ.हेमंत राठी यांनी माजी नगराध्यक्ष डॉ.के.ई. राठी यांच्या स्मृती प्रित्यर्थ शहरातील आर्थिक दुर्बल घटकातील पंचवीस नेत्र रुग्णाच्या शस्र क्रिया मोफत करण्याची घोषणा केली त्याची शिफारस करण्याचे अधिकार त्यांनी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना बहाल केले आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक चेतन खुबाणी यांनी केले तर उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी उपनगराध्यक्ष विजय वाजे यांनी नगराध्यक्ष वाहाडणे यांच्या या कार्याचे तोंडभरून कौतुक केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन महारुद्र गालट यांनी केले तर उपस्थितांचे आभार नरेंद्र मोदी मंचचे शहराध्यक्ष विनायक गायकवाड यांनी मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close