जाहिरात-9423439946
शैक्षणिक

…या शहरात रात्री उल्का वर्षाव दर्शन कार्यक्रम

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगांव तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित के.जे.सोमैया महाविद्यालयात अँस्ट्रो क्लब तर्फे बुधवार दि.१३ डिसेंबर रोजी रात्री उल्का वर्षाव दर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.एस.यादव यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

   

‘जेमिनीड’ हा उल्कावर्षाव ३२०० फेथन या लघुग्रहाच्या तुकड्यांमुळे होतो.काही अभ्यासकांच्या मते फेथन हा निष्क्रिय झालेला धूमकेतू असावा.हा लघुग्रह दर दीड वर्षांनी सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करतो. दि.२४ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीत जेमिनीडच्या उल्का अवकाशात पहावयास मिळतात.

खगोलप्रेमींना जेमिनीड उल्कावर्षाव हा अंधाऱ्या ठिकाणावरून स्पष्ट बघता यावा यासाठी महाविद्यालयातील अँस्ट्रो क्लब च्या वतीने एक आंतरराष्ट्रीय दर्जाची अद्ययावत ऑब्झरर्वेट्री तयार करण्यात आली असून त्याचा फायदा कोपरगाव तालुक्यातील खगोलप्रेमी नागरिक व विद्यार्थी यांना होणार आहे. दिं.१३ डिसेंबर रोजी सूर्यास्तानंतर तासाभरात जेमिनीड उल्कावर्षावाचा उगमबिंदू (रेडियंट) उगवत असल्याने रात्री नऊपासून पहाटेपर्यंत जेमिनीडच्या उल्का पाहता येणार आहे.मध्यरात्री एक ते दोन या कालावधीत उल्कावर्षाव दिसण्याचे प्रमाण सर्वाधिक असेल.या कालावधीत शंभरपेक्षा अधिक उल्का दिसण्याचा अंदाज असुन हे दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारा असेल.
  
   या वर्षी स्वच्छ चंद्रप्रकाश व ढगांचा अडथळा नसल्याने जेमिनीडच्या अधिक उल्का रात्री पाहता येतील असे खगोल अभ्यासकांचे म्हणणे आहे.जेमिनीड हा उल्कावर्षाव ३२०० फेथन या लघुग्रहाच्या तुकड्यांमुळे होतो.काही अभ्यासकांच्या मते फेथन हा निष्क्रिय झालेला धूमकेतू असावा.हा लघुग्रह दर दीड वर्षांनी सूर्याभोवती एक परिक्रमा पूर्ण करतो. दि.२४ नोव्हेंबर ते २४ डिसेंबर या कालावधीत जेमिनीडच्या उल्का अवकाशात पहावयास मिळतात.के.जे. सोमैया महाविद्यालयात अँस्ट्रो क्लब तर्फे अद्ययावत सुख-सुविधांनी निर्मित अशा ऑब्झरर्वेट्री (अवकाश निरीक्षण केंद्र) च्या वतीने आयोजित उल्का वर्षाव दर्शन कार्यक्रमाचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे विश्वस्त संदिप रोहमारे यांनी केले आहे.

या कार्यक्रमाच्या नाव नोंदणीसाठी खगोल अभ्यासक व महाविद्यालयातील भूगोल विभागाचे प्रा.डॉ.वसुदेव साळुंके (9370389291) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन शेवटी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close