कोपरगाव तालुका
कोपरगावच्या विकासासाठी राजकारण बाजूला ठेवा-नगराध्यक्ष विजय वहाडणे
संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव ( प्रतिनिधी ) कोपरगाव शहर व तालुक्याचा विकास करायचा तर राजकारण बाजूला ठेवावे लागेल तरच जनतेला विकासाचा सूर्य दिसू शकेल असे स्पष्ट प्रतिपादन कोपरगाव नगर परिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी आज दुपारी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.कोपरगाव नगरपरिषदेच्या वतीने पालिकेत अध्यक्षपदी असताना विशेष कार्य करणाऱ्या स्व. नगराध्यक्ष उत्तमशेठ अजमेरे, रघुनाथ गिरमे,माधवराव आढाव,प्रेमराज काले यांच्या प्रतिमांचे अनावरण केले त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.सदर प्रसंगी कैलास ठोळे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,राष्ट्रवादीचे नेते विजय आढाव,गटनेते विरेन बोरावके,माजी नगरसेवक अतुलशेठ काले, दिलीप अजमेरे,बाबासाहेब गिरमे,नरेंद्र मोदी मंचचे अध्यक्ष विनायक गायकवाड,माजी नगरसेवक संजय कांबळे,रंजन जाधव,चेतन खुबाणी,पप्पू पडियार, कांचनताई काले,आदींसह बहुसंख्येने कार्यकर्ते,नागरिक उपस्थित होते.त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणाले कि,कोपरगावचा विकास का होत नाही हा प्रत्येक नागरिकाने विचार करावा,याला कोण दोषी आहे हे सर्वांना माहित आहे/पाच क्रमांकाच्या तलावाचे काम कोण होऊ देत नाही हे आपण वेळोवेळी सांगितले आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थित संपन्न झालेल्या बैठकीत गायत्री कंपनीने काम करण्यास तयार असल्याचे सांगून माती व मुरुमाचे नमुने घेऊन गेल्यावर त्याला कोणी खोडा घातला हे परत सांगण्याची गरज नाही.या बाबत शपथ पूर्वक सांगतो केवळ राजकारणासाठी या तलावाचे काम होऊ दिलेले नाही.सत्ताधाऱ्यांच्या उमेदवाराला मतदारांनी निवडून दिले नाही म्हणून तुम्ही लई बॅट-बॅट करत होता म्हणून बेत पाहणे हे केंव्हाही वाईटच. अशा पद्धतीचे राजकारण केले तर कधीच तालुक्याचा विकास होणार नाही. ज्यांच्या प्रतिमा आज कार्यालयात लावत आहे त्यांनी कधीच स्वतःच्या टपऱ्या रस्त्यावर अतिक्रमणात ठेवल्या नाही कि कधी स्वतः कुठला प्लॉट हडप केला नाही,कि नगरपरिषदेत अतिक्रमण केले नाही असे म्हणून सत्ताधाऱ्यांना कोपरखिळी मारली त्यावेळी अनेकांना हसू आवरले नाही.
नगराध्यक्ष विजय वहाडणे हे कायम खिशात हात घालून शहरातील विकास कामांची पाहणी करत असल्याचे फोटो सामाजिक संकेतस्थळावर टाकत असल्याचा आपल्यावर आरोप होतो मात्र आपण स्वतःच्या खिशात हात याच्यासाठी घालतो कि,आपल्या खिशात कोणाला हात घालता येऊ नये.व दुसऱ्याच्या खिशात हात घालण्यापेक्षा स्वतःच्या खिशात हात घालणे केंव्हाही चांगले असे म्हटल्यावर उपस्थितांना हसू आवरले नाही.
शहरातील नागरिक आपल्याच कुटुंबातील सदस्य आहेत असे समजून काम केले तर तत्कालीन नगराध्यक्ष जंगुशेठ अजमेरे सारखे कुठेही नगराध्यक्ष सह्या करू शकतात व ते स्वतः रस्त्याच्या कामावर हजर राहून काम करून घेत म्हणून त्यावेळचे रस्ते अजूनही दमदार आहेत.आज मात्र आमचे सहकारी व त्यांचे नेते वहाडणे यांना कुठे अडकवता येईल याच्या शोधात असतात पण माझेही त्यांना जाहीर आव्हान असल्याचे सांगून रहिवासी दाखल्यांसाठी आलेले नागरिक थेट आपल्या आतील दालनात येऊ शकतात असे सांगितले.पालिकेत काम करताना आपण टीका करणारांचा सुद्धा सन्मान केला असून त्यांची सुद्धा कामे करीत असल्याचे गौरवाने सांगितले त्यांचा प्रभागात जाऊन आपण समास्याचा निपटारा करतो.मात्र आमचे सहकारी सार्वजनिक कार्यक्रमात येतांना त्यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या परवानगीशिवाय येऊ शकत नसल्याची कोपरखिळी हाणून यावेळी आपण म्हणूनच सर्वांना सामाजिक संकेतस्थळावरून सर्वांना निमंत्रण दिले ज्याला यायचे ते आदराने येतील असा विश्वासही शेवटी व्यक्त केला.
कोपरगाव नगरपरिषद स्व-भांडवलातून अध्यक्षांना किमान नऊ लाखांची गाडी येऊ शकते मात्र आपण आता गाडी घेऊ, पण सत्ता गेल्यावर काय …? म्हणून आपण गाडी घेण्यास नम्र नकार दिल्याचे वहाडणे यांनी सांगून किती तरतूद आहे अशी विचारणा समोर बसलेले माजी नगराध्यक्ष संजय सातभाई यांना केली असता त्यांनी बारा लाखांची तरतूद असल्याचे निसंकोच सांगून टाकले.आगामी काळात आपण प्रेमराज काले, कन्हैयालाल राठी,वामनराव शिलेदार,बाबुराव गवारे मामा,वसंतराव(बाळासाहेब)सातभाई,बबनराव वाजे आदींच्या प्रतिमा पालिकेत लावणार असल्याचे वहाडणे यांनी सांगितले आहे.
सदर प्रसंगी राष्ट्रवादीचे नेते विजय आढाव,मुख्याधिकारी प्रशांत सरोदे,उद्योजक कैलास ठोळे,ममता काले, आदींनी माजी अध्यक्षांच्या कार्याला उजाळा दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक चेतन खुबाणी यांनी केले तर सूत्रसंचलन महारुद्र गालट यांनी केले तर उपस्थितांचे आभार विनायक गायकवाड यांनी मानले.
माजी नगराध्यक्षांचे काम अतिशय चांगले असल्याने आजही जेष्ठ अधिकारी व कर्मचारी त्यांची आवर्जून आठवण काढतात असे गौरवोद्गार मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी काढले.