जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

“..तर तुमच्या सहकारातील भ्रष्टाचाराचे काय”-प्रा.शिंदेचा सवाल

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव वकिल संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलतांना विवेक कोल्हे यांनी नगरपरिषदेच्या रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचाराचा वास येत असल्याचा बिन बुडाचा आरोप केल्यानंतर आज त्याला उत्तर देण्यात आले असून सहकारातील तुमच्या भ्रष्टाचाराचे काय असा तिखट सवाल भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा.सुभाष शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकांवये केला असल्याने हा शिमगा कुठपर्यंत सुरू राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

” विवेक कोल्हे यांनी भान ठेवून बोलायला हवे,तुम्ही तर भ्रष्ट पैशात लडबलेले आहात”व ” तुम्हाला भ्रष्टाचाराचा वास येतो पण तुमच्या भ्रष्टाचाराचे काय ? सहकारात प्रचंड भानगडी करून जमविलेल्या पैशांच्या जोरावरच तुमचे राजकारण चालू आहे.नगरपरिषदेच्या कामात अडथळे आणून तुम्ही कोपरगावातील मतदारांचा सूड उगवत आहात”-प्रा,सुभाष शिंदे,माजी अध्यक्ष,कोपरगाव शहर भाजप.

अहमदनगर जिल्हा बँकेची निवडणूक नुकतीच संपन्न झाली असून या निवडणुकीत चार जागांचा अपवाद वगळता सर्व जागा बिनविरोध निवडून आणल्या गेल्या या पार्श्वभुमीवर कोपरगाव वकील संघाने नुकताच कोपरगावचे आ.आशुतोष काळे व कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांचा सत्कार आयोजित केला होता त्यात तेथील वकिलांनी घराणेशाहीला आक्षेप घेत दुसऱ्या निष्ठावान कार्यकर्त्याना संधी का दिली नाही ? असा सवाल करत या तिसऱ्या पिढीतील दोन्ही युवराजांना अड्.दिलीप लासुरे यांनी अडचणीत टाकले असताना तेथे उपस्थित झालेल्या कोपरगावातील शहर भाजपच्या नगरसेवकांनी निविदा नामंजूर केलेल्या रस्त्यांच्या प्रश्नाला उत्तर देताना कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी नगरपरिषदेच्या रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचाराचा वास येत असल्याचा आरोप केला होता.त्याला आज भाजपचे माजी शहराध्यक्ष प्रा.सुभाष शिंदे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये उत्तर दिले आहे त्यात सहकारातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित केला आहे.

त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,” विवेक कोल्हे यांनी भान ठेवून बोलायला हवे,तुम्ही तर भ्रष्ट पैशात लडबलेले आहात”व ” तुम्हाला भ्रष्टाचाराचा वास येतो पण तुमच्या भ्रष्टाचाराचे काय ? सहकारात प्रचंड भानगडी करून जमविलेल्या पैशांच्या जोरावरच तुमचे राजकारण चालू आहे.नगरपरिषदेच्या कामात अडथळे आणून तुम्ही कोपरगावातील मतदारांचा सूड उगवत आहात”.नगराध्यक्ष व आमदारकी हातातून गेल्याने तुम्ही चवताळून नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत असता.माजी आ.स्नेहलता कोल्हे यांचे नाव न घेता ते पुढे म्हणाले की,”त्यांनी तर सातत्याने वहाडणे यांचा द्वेषच केला.विजय वहाडणे यांना तुम्ही असाच विरोध सुरू ठेवला तर येणाऱ्या नगरपरिषदेच्या निवडणुकीत “कोल्हे”पराभवाची हॅटरिक झाल्याशिवाय राहणार नाही.शेतकऱ्यांच्या उसाच्या वजनात काटा मारणारे,पाणी चोरणारे,जनतेच्या पैशांवर आलिशान गाड्या वापरणाऱ्या कोल्हे यांनी भ्रष्टाचाराविरुद्ध तोंड बंद ठेवले तर बरे होईल.आम्ही बोलायला लागलो तर तुम्हाला अवघड होईल हे लक्षात ठेवा.शहरातील मोक्याचे रस्ते झाले तर नगराध्यक्ष वहाडणे यांना श्रेय मिळेल याची तुम्हाला भिती वाटते.जनतेचा अंत पाहू नका अन्यथा तुम्हाला कोपरगावात राजकारण करणे जड जाईल असा इशाराही शेवटी प्रा.सुभाष शिंदे यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close