कोपरगाव तालुका
कोकमठाण येथे माझी वसुंधरा अभियान उत्साहात संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव( प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण ग्रामपंचायत यांचे मार्फत, “माझी वसुंधरा अभियान” अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व रामदासी महाराज आश्रम परीसर या ठिकाणी या अभियानाचा शुभारंभ मोठ्या उत्साहात करण्यात आला आहे.
माझी वसुंधरा अभियानांतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी तीन शहरं,तीन नगरपरिषदा,तीन नगरपंचायती आणि तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार देण्यात येणार आहेत.सर्वोत्तम कामगिरी करणारे एक विभागीय आयुक्त,तीन जिल्हाधिकारी तसंच तीन जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना, बक्षीसं देऊन गौरवण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन वर्षात पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागातर्फे आयोजित,माझी वसुंधरा ई-शपथ उपक्रमाचा,दूरदृष्यप्रणालीद्वारे शुभारंभ केला आहे.नवीन वर्षात पर्यावरण रक्षण आणि संवर्धनासाठी नागरिकांनी पर्यावरण संवर्धनाची शपथ घ्यावी,यासाठी माझी वसुंधरा डॉट इन,या संकेतस्थळाला भेट द्यावी, ही शपथ घेणाऱ्या व्यक्तीला तत्काळ प्रमाणपत्र उपलब्ध करून दिलं जाणार आहे.नागरिकांनी मोठ्या संख्येने पर्यावरण रक्षणासाठी शपथ घ्यावी,असं आवाहन विभागाकडून करण्यात आलं आहे.
या दिनानिमित्त कोकमठाण या ठिकाणी गावातील विविध ठिकाणी श्रमदान करण्यात आले.जे.सी.बी.यंत्राच्या सहाय्याने काटेरी वनस्पती काढण्यात आल्या तसेच गटार स्वच्छता व घनकचरा वाहतुकीचे काम करण्यात आले.
यावेळी उपस्थित जिल्हा परिषद वारी गटाच्या सदस्या सोनाली साबळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहम, उषाताई दुशिंग,दादासाहेब साबळे, माजी शिवसेना जिल्हा उपप्रमुख बाळासाहेब जाधव,महेश लोंढे,प्रभाकर धिवर,साहेबराव रक्ताटे,अजित रक्ताटे, दिपक कराळे,अल्लाउद्दीन सय्यद अंगणवाडी सेविका,अंगणवाडी मदतनीस,आशा सेविका,जि.प.प्रा.शाळा शिक्षक व ग्रामपंचायत कर्मचारी,ग्रामविकास अधिकारी दिलीप गायकवाड,सहाय्यक गटविकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,महिला बालकल्याण अधिकारी श्री. वाघीरे, कृषी विस्तार अधिकारी श्री.साबळे व बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
सदरच्या श्रम दान कार्यक्रमा करिता कोपरगाव पंचायत समितीचे सहाय्यक गट विकास अधिकारी सोनकुसळे,महिला बाकल्याण अधिकारी श्री वाघिरे तसेच कृषी विस्तार अधिकारी श्री साबळे यांनी भेट देऊन मार्गदर्शन केले आहे.