कोपरगाव तालुका
देर्डे-कोऱ्हाळे शाळेत पंचवीस हजारांची चोरी,गुन्हा दाखल
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यातील देर्डे – कोऱ्हाळे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या जिल्हा परिषद शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गाच्या दरवाजाचे रात्रीचे सुमारास कडी व कोयांडा तोडून त्या वर्गातील व्हिडिओकॉन कंपनीचा एल. ई. डी. दुरदर्शन संच अज्ञात चोरट्याने चोरून नेला आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात शाळेचे मुख्याध्यापक बाबा दशरथ गायकवाड यांनी अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा र.नं. 115/2019 भा.द.वि. कलम 457,380 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांचे मार्गदर्शनाखाली पो. हे. कॉ.एम.ए. कुसारे हे करीत आहेत.