जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव शहरात 93 तर तालुक्यात 177 गणपती स्थापन

जाहिरात-9423439946

संपादक(नानासाहेब जवरे)कोपरगाव ( प्रतिनिधी)बुद्धीची देवता म्हणून गणल्या गेलेल्या श्री गणेशाचे काल कोपरगाव शहर व तालुक्यात मोठ्या उत्साहात सांगत झालेले असून शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत 93 गणेश मंडळांनी गणेशाला विराजमान केले आहे तर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत 177 गणेश मंडळांनी गणेश बाप्पाला मानाचे पान पुढे केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात बुद्धीची देवता असणाऱ्या श्री गणेशाचे आगमन झाले आहे.पुढील नऊ दिवस या गणेशाचे वास्तव्य आपल्या घरात सार्वजनिक ठिकाणी असणार आहे.यंदाचा गणेशउत्सव पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.परतीचा मान्सून पुन्हा प्रकट झाल्याने आणखी आनंदात भर पडली आहे.कोपरगाव तालुका त्याला अपवाद नाही.कोपरगाव तालुक्यात पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी वर्गात अनंदाचेच वातावरण आहे.त्यामुळे यावर्षी त्याच्या आनंदात भर पडली असल्यास नवल नाही.एकट्या कोपरगाव शहरात या वर्षी सोळा तर त्याच्या ग्रामीण भागात सोळा असे एकूण 93 गणपती विराजमान झाले तथापि एक गाव एक गणपती या संकल्पनेला मात्र वाव मिळाला नसल्याचे दिसून आले आहे.या सर्व गणेश मंडळांना आपण या उत्सवात ध्वनी प्रदूषण न करण्याच्या व रात्री दहाच्या आत वाद्य बंद करून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी जनशक्तीला न्यूजला दिली आहे.

या सर्व गणेश मंडळांना आपण या उत्सवात ध्वनी प्रदूषण न करण्याच्या व रात्री दहाच्या आत वाद्य बंद करून कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या सूचना दिल्या असल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी जनशक्तीला न्यूजला दिली आहे.

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण 173 गणेश मंडळांनी आपल्या गावात त्याचे जोरदार स्वागत केले आहे. मात्र कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत मात्र एक गाव एक गणपती या संकल्पनेला बरा प्रतिसाद मिळाला असून अकरा गणेश मंडळांनी प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे कोपरगाव शहर व तालुक्यात एकूण 270 गणपती मंडळांनी आपले बस्तान बसवले आहे आता कायदा सुव्यवस्थेचे पोलिसांपुढे आव्हान आहे. ते ते कसे पेलतात हे लवकरच कळणार आहे.तथापि त्यांनी सर्व मंडळांना पूर्व सूचना देऊन,बैठका घेऊन पूर्वतयारी केली आहे त्यासाठी जागोजागी संदेश पोहचवले आहे.रस्त्यावर विनाकारण अतिक्रमण करून कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी व कायदा सुव्यवस्था राखावी हि जबाबदारी सर्वच सर्व गणेश मंडळांची आहे अशी माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी जनशक्ती न्यूजला दिली आहे.

सर्व मंडळांना पूर्व सूचना देऊन,बैठका घेऊन पूर्वतयारी केली आहे त्यासाठी जागोजागी संदेश पोहचवले आहे.रस्त्यावर विनाकारण अतिक्रमण करून कोणालाही त्रास होणार नाही याची खबरदारी घ्यावी व कायदा सुव्यवस्था राखावी हि जबाबदारी सर्वच सर्व गणेश मंडळांची आहे अशी माहिती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी जनशक्ती न्यूजला दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close