जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

व्यापारी कचेश्वर महापूरे यांचे निधन

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

कोपरगाव शहरातील निवारा उपनगरातील प्रसिद्ध व्यापारी कचेश्वर सखाराम महापुरे (वय-५५)यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पश्चात दोन भाऊ,पत्नी,दोन मुले,एक मुलगी असा परिवार आहे.त्यांच्या निधनाने कोपरगाव शहरावर शोककळा पसरली आहे

मूळ कोपरगाव काले मळा येथील रहिवासी असलेले स्व.कचेश्वर महापुरे हे अत्यंत धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी अत्यंत कष्टातून आपला व्यवसाय उभा केला होता.आधी आठवडे बाजारात आपला पारंपरिक तेलाचा व्यवसाय करून त्यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला. नंतर स्वतः उभारलेल्या तेलाच्या जुन्या पद्धतीवर आधारित घाण्यावर तेलाचे उत्पादन करून व्यापार वाढवला व नंतर निवारा स्वतःचा नवीन मॉल पद्धतीचे दुकान उभारले होते.

त्यांच्यावर काल दुपारी एक वाजेच्या सुमारास कोपरगाव गोदावरीकाठी असलेल्या अमरधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यावेळी जिल्ह्यातील तेली महासभेचे पदाधिकारी ,माजी नगराध्यक्ष दिलीप दारूणकर या सह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close