नगर जिल्हा
काँग्रेसच्या कोपरगाव तालुकाध्यक्षपदी नितीन शिंदे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)-
कोपरगाव तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची नुकतीच निवड करण्यात आली असून कोपरगाव तालुकाध्यक्षपदी जेऊर कुंभारी येथील कार्यकर्ते नितीन शिंदे यांची निवड प्रदेशाध्यक्ष आ.बाळासाहेब थोरात यांनी नियुक्ती केली आहे त्यांच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
राज्याच्या कार्यकारिणीची नुकतीच निवड होऊन राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी व माजीअध्यक्ष राहुल गांधी यांनी महाराष्ट्राच्या प्रदेश अध्यक्षपदी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची वर्णी लावली होती.आगामी ऑक्टोबर महिन्यात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीची आचार संहिता लागू होण्यास काही दिवसाचाच कालावधी राहिलेला असतांना पदाधिकारी निवडी होणे हि बाब अपरिहार्य बनली होती. त्यामुळे कोपरगाव तालुका कार्यकरिणीकडे कोपरगाव तालुक्याचे लक्ष लागणे स्वाभाविक होते. त्याप्रमाणे हि कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली असून तालुकाध्यक्षपदी जेऊर कुंभारी येथील युवक कार्यकर्ते नितीन शिंदे यांची निवड झाल्याने त्यांच्या निवडीचे सर्वत्र स्वागत होत आहे. काँग्रेस सध्या प्रतिकूल कालखंडातून जात असून नूतन अध्यक्ष नितीन शिंदे यांना तालुक्यात पक्ष वाढविण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार असून ते बी. ई.मेकॅनिकल असे पदवीधारक असून त्यांचा तालुक्यात दांडगा संपर्क असल्याने ते या पदाला नक्कीच न्याय देतील असा आशावाद साई संस्थानचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर यांनी जनशक्तीशी बोलतांना व्यक्त केला आहे.
तालुकाध्यक्ष नितीन शिंदे यांच्या निवडीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात,आ. सुधीर तांबे जिल्हा परिषद कृषी विभागाचे सभापती अजय फाटांगरे,जि.प. सदस्य रामहरी कातोरे.युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील साळुंके,तुषार पोटे,अशोक गायकवाड,कैलास सोमासे,राहुल क्षीरसाठ,बबलू जावळे,प्रणव जोर्वेकर,प्रताप डांगे आदींनी स्वागत केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.