जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

प्रस्थांपितांचे भरणे झाले ,शेतकरीच ठेवले वंचित-लासुरे यांचा आरोप

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी )

गोदावरी दुथडी भरून वाहत असताना शेतकऱ्यांची पिके सोडून प्रस्थापित नेत्यांनी आपले खरिपाचे भरणे काढून घेतले मात्र तालुक्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिल्याची टीका कोपरगाव येथील प्रसिद्ध वकील दिलीप लासुरे यांनी नुकतीच एका प्रसिद्धी पत्रकान्वये केली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव तालुक्यात या वर्षी पर्जन्यमान जेमतेमच आहे मात्र नाशिक जिल्ह्यात धरणाच्या पाणलोटक्षेत्रात मात्र पावसाने कहरच उडून दिल्याने गोदावरीला जलसंपदा विभागाला तीन ऑगष्ट रोजी पावणे तीन लाख क्युसेसने पाणी सोडावे लागले.त्यामुळे गोदावरीला २००६ साला नंतर प्रथमच मोठा पूर आला त्यात गोदाकाठच्या नागरिकांचे मोठे नुकसान झाले.

मराठवाड्यातील जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले.मात्र कोपरगाव तालुक्यात मात्र पाऊस जेमतेम पेरणी व त्या नंतर खरीप पिकांना जीवदान देण्यापूरताच झाला.पावसाने आता उघडीप दिल्याने खरीप पिकांनी आपल्या माना टाकण्यास प्रारंभ केला आहे.हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेण्याची भीती निर्माण झाली आहे.अशातच तालुक्याच्या लोकप्रतिनिधींनी जलसंपदा विभागाशी संपर्क साधून वेळीच गोदावरी कालव्यांना पाणी सोडण्यासाठी जलसंपदाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाशी संपर्क साधायला हवा होता मात्र परिस्थिती नेमकी उलटी झाली.नेत्यांनी आपल्या खरिप पिकांच्या भरण्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून काढून घेतल्या व तालुक्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.आपण अधिकाऱ्यांना भेटून निवेदने दिली मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही.त्यामुळे शेतकऱ्यांत मोठा असंतोष आहे.ज्या नेत्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून आपले भरणे काढून घेतले त्यांची चौकशी झाली पाहिजे.व जलसंपदाच्या अधिकाऱ्यांकडून खरीप पिकांना पाणी घेण्यासाठी आता थेट कालव्यांचे गेट तोडण्याचे आंदोलन करावे लागेल असा इशारा दिलीप लासुरे यांनी दिला आहे.जर शेतकऱ्यांना खरीप पिकांना पाणी मिळाले नाही तर तालुक्यातील शेतकरी प्रस्थापित नेत्यांना आगामी विधानसभा निवडणुकित मतदारसंघात फिरकू देणार नाही व या नेत्यांची पाचशे रुपयात मतदारांना विकत घेऊची घमेंड तोडल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी शेवटी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close