जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी २.५० कोटींचा निधी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील दळणवळण व वाहतुकीसाठी महत्वपूर्ण ठरणाऱ्या टाकळी-रवंदे या रस्त्यासाठी शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने नुकताच अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असल्याने नागरिकानी समाधान व्यक्त केले आहे.

कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या (प्रजिमा ५) च्या टाकळी ते रवंदे या अडीच किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती.त्यामुळे या रस्त्यावरून नियमितपणे ये-जा करणाऱ्या रवंदे,टाकळी च्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.या अडीच किलोमीटर खराब रस्त्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत होते.

कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या (प्रजिमा ५) च्या टाकळी ते रवंदे या अडीच किलोमीटर रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती.त्यामुळे या रस्त्यावरून नियमितपणे ये-जा करणाऱ्या रवंदे,टाकळी च्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता.या अडीच किलोमीटर खराब रस्त्यांमुळे अनेक छोटे-मोठे अपघात घडत असल्यामुळे रवंदे,टाकळी च्या नागरिकांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी आ.आशुतोष काळे यांचेकडे मागणी केली होती.खराब रस्त्यामुळे नागरिकांची होत असलेली गैरसोय लक्षात घेवून आ.काळे यांनी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मिळावा यासाठी शासनदरबारी पाठपुरावा सुरु होता.मतदार संघातील खराब रस्त्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी मागील वर्षापासून आलेल्या कोरोना संकटात देखील अनेक रस्त्यांसाठी निधी मिळविण्यासाठी प्रयत्नशील असून त्या प्रयत्नांना अपेक्षित यश मिळत देखील मिळत आहे.त्यापैकी (प्रजिमा ५) वरील टाकळी ते रवंदे या अडीच किलोमीटर रस्त्याचे रुंदीकरण,मातीभराव,खडीकरण,मजबुतीकरण,डांबरीकरण,मुरुम बाजूपट्टी,कच्चे गटर्स,नवीन पाईप मोरीचे बांधकाम आदी कामांसाठी नाबार्ड कडून अडीच कोटी रुपये निधीला मंजुरी देण्यात आली असून लवकरच या रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम सुरु होणार असल्याचे आ. काळे यांनी सांगितले आहे.

मागील पाच वर्षापासून या रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवून या रस्त्यासाठी निधी मिळविल्याबद्दल रवंदे, टाकळी च्या नागरिकांनी व या रस्त्याने नियमितपणे ये-जा करणाऱ्या वाहनधारकांनी लोकप्रतिनिधींचे यांचे आभार मानले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close