जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
निधन वार्ता

शेतकरी संघटनेचे नेते प्रा.डॉ.काचोळे कालवश

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

शेतकरी संघटनेचे नेते व स्वतंत्र भारत पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष डॉ.मानवेंद्रनाथ काचोळे (वय- ) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले आहे.त्यांच्या पच्छात पत्नी मंगलाताई,दोन मुली,जावई असा परिवार आहे.ते कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांचे मेहुणे तर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष स्व.सूर्यभान पाटील वहाडणे यांचे जावई होते.

स्व.मानवेंद्रनाथ काचोळे हे अतिशय तीव्र बिधीमत्ता असलेले व्यक्तिमत्व होते.त्यांचा शेतीविषयी खूप अभ्यास होता.विशेषतः खुली अर्थव्यवस्थेचे ते समर्थक होते.त्यांनी शेतकऱ्यांना गट करार,डब्ल्यू.टी.ओ.आदी संकल्पना सोप्या भाषेत समजावून सांगितल्या होत्या.त्यांनीं शेतकरी संघटनेत सहभागी होऊन शेतकरी संघटनेला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले होते-रघुनाथ दादा पाटील,प्रदेशाध्यक्ष,शेतकरी संघटना.

गत काही दिवसापूर्वी डॉ.काचोळे यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.त्यांच्यावर औरंगाबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते.मात्र उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांना वाचविण्यात यश आले नाही.स्व.डॉ.काचोळे हे शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खा.शरद जोशी यांचें निष्ठावान सहकारी होते.त्यांचा शेतीशी संबंधित विषयावर मोठा अभ्यास होता.त्यामुळे शेतकरी संघटनेने स्थापन केलेल्या स्वतंत्र भारत पक्षाचे ते पहिले अध्यक्ष म्हणून त्यांची खा.शरद जोशी यांनी निवड केली होती याशिवाय शेतकरी संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्यही होते.१९७४ साली त्यांनी मराठवाडा विकास आंदोलनातही सहभाग नोंदवला होता.सध्या महात्मा गांधी विद्यापीठात ते संशोधक संचालक होते.त्यांचे मूळ गाव हे कन्नड तालुक्यातील जवखेडा हे होते.व सध्या ते खोकडपुरा या भागात रहिवाशी होते.ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जैवरसायन विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते.त्यांनी कुलसचिव म्हणूनही जबाबदारी पार पाडली होती.त्यांनी परभणीतून सन-२००९ ची लोकसभा निवडणूक लढवली होती.त्यावेळी शरद जोशी त्यांच्या गंगाखेडच्या सभेत प्रचाराला आले होते.त्या वेळी ते म्हणाले होते.”परभणीकरांनो तुम्हाला पंतप्रधान दर्जाचा उमेदवार दिलाय,असे सांगून त्यांच्या बुद्धिमत्तेचा गौरव केला होता.त्यांच्या प्रचारासाठी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते स्वतःच्या घरच्या भाकरी बांधून प्रचाराला येत असत व प्रचार करत असत.सरांनी कधी स्वतःसाठी मते मागितली नाही.ते केवळ शेतकरी संघटनेची स्वातंत्रवादाची भूमिका शेतकऱ्यांना पटवून देत.व शेतकऱ्याप्रती असलेली निष्ठा दाखवून देत असत.भूमिका मांडत असत.मात्र आपली निशानीही कधी सांगत नसत.ते खुल्या अर्थव्यवस्थेचे समर्थक होते.

स्व.मानवेंद्रनाथ काचोळे यांच्या निधनाने शेतकरी संघटनेची मोठी हानी झाली आहे.त्यांचा शेती प्रश्नाचा मोठा अभ्यास होता.त्यामुळे शेती विषय त्यांनी शेतकऱ्यांना सोप्या भाषेत समजावून सांगितला होता.त्यामुळे त्यांच्याबद्दल शेतकऱ्यांत मोठा आदर होता-लक्ष्मणराव वडले,उपनेते शिवसेना.

त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या निधनाबद्दल शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राघुनाथदादा पाटील कार्याध्यक्ष कालिदास आपेट,सेनेचे उपनेते लक्ष्मणराव वडले,शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अड्.अजित काळे,कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे,निळवंडे कालवा कृती समितीचे अध्यक्ष रुपेंद्र काले.यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close