जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावात दुसरे वहाडणे निर्माण होण्याची साधार भीती,संघर्षाचे मूळ !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(नानासाहेब जवरे)

सुधारणे विषयी किंवा चांगल्या कामाबद्दल उलटे बोलणारे अनेक असतात.परंतु जसा रानात व्याघ्र जास्त माजला असता त्यास सर्व मिळून ठार मारतात.तसे उलटे बोलणाऱ्यांचा धिक्कार सामान्य नागरिक का करत नाही ? त्या विषयी त्यांचे एकमत का होत नाही ? हा समस्त सामाजिक कार्यकर्त्यांना सातत्याने सतावणारा प्रश्न आहे.त्याला कोपरगाव शहरही अपवाद नाही.वर्तमानात कोपरगाव नगरपरिषदेत शहरातील विविध विकास कामांचे ठराव भाजपच्या नगरसेवकांनी एकमताने फेटाळून लावले आहे.त्यामुळे आरोप-पर्त्यारोपांची राळ उठली आहे.व त्यात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांना राष्ट्रवादीने साथ देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करून व घरोघरी भाजपच्या नकारात्मक व्हेटोबाबत जनजागृती करून त्यानां उघड केल्याने त्याला पुन्हा भाजपचे गत नगरपरिषद निवडणुकीतील उमेदवार पराग संधान यांनी आपल्या भाजप-सेनेच्या वीस शिलेदारांना घेऊन त्याला उत्तर देऊन अठ्ठावीस कामे का घेतली नाही ? असा जाबसाल केला आहे.त्याला नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी सर्व कामे घेणार असून ज्या कामांच्या तांत्रिक बाबी अर्धवट आहे ती कामे नंतर घेतली जाणार असल्याने उत्तर दिले आहे.मात्र तरीही हा शिमगा थांबण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाही आणि दिसण्याची चिन्हेही नाही.त्याला कारण या वर्षाच्या शेवटी नोव्हेंबर महिन्यात होत असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणुका!

नाकासमोर चालणाऱ्यांच्या हातात काही मिळत नाही.उलट चालता-चालता समोरच्याचे नाक दाबून तोंड उघडायला लावणे म्हणजे राजकारण असे यांचे राजकीय समीकरण आहे.तर यांच्या लेखी निसंधिग्धतेपेक्षा संधिग्धता निर्यायक ठरत असते.त्यामुळे या आगामी काळात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या भोवती संधिग्धततेचे जाळे उभे करून आपला डाव साधायचा आहे.त्यामुळे सुरु झालेला कोलाहल आगामी दहा महिन्यात थाम्बणार नाही असे दिसत आहे.

कोणत्याही निवडणुका म्हटल्या की सत्ताधारी पक्षाला आणि विरोधकांना काही तरी काल्पनिक शत्रू शोधून काढावा लागतो व त्याकडे निर्देश करून मतदारांना भीती दाखवून “…त्या” भया पासून “तुमच्या समूहाला मोठा धोका असल्याचे” आकंठ ओरडून सांगावे लागते.व या भयपटातून, “आम्हीच तुम्हाला वाचवू शकतो” अशी भीती दाखवावी लागते.तरच मतदार राजा कोंबडीच्या पिल्लांसारखा एका पंखाखाली एकवटतो.व तो एकदा आपल्या पंखाखाली आला की नेत्यांची आगामी निवडणुकीची शिबंदी जमा होऊन त्यांची होडी निवडणुकीची नदी पार करून लीलया पैलतीराला जात असते हे वेगळे सांगण्याची गरज नाही.हे एकदा स्पष्ट केले की कोपरगाव नगरपरिषेत राजकारण्यांची कोल्हेकुई आत्ताच का सुरु झाली ? याचे उत्तर लीलया मिळून जाते.एरव्ही चार वर्ष याच नगरसेवकांनी अध्यक्ष वहाडणे यांचेशी जमवून घेऊन आपल्या प्रभागातील कामे सोयीस्कर करून घेतल्याचे शहरातील बहुतांशी प्रभागात केल्याचे अनके पुराव्यावरून दिसून येईल.त्यामुळे नगराध्यक्ष वहाडणे आत्ताच वाईट का दिसु लागले आहे.याचे उत्तर वरील विवेचनात आपल्याला दडलेले दिसून येईल.याचा अर्थ असा नव्हे की,नगराध्यक्ष वहाडणे यांनी सर्वच कामे योग्य झाली असे म्हटले जाऊ शकत नाही.नगरपरिषदेच्या इमारतीचे उदघाटन,अण्णाभाऊ साठे पुर्णाकृती पुतळा गत निवडणुकीपूर्वी घाईघाईत केल्याचे अनेकांना स्मरत असेल.त्यावरून असेच रणकंदन झाल्याचे अनेकांना आठवत असेल.ते अजूनही पूर्ण करण्यात त्यांना यश मिळाले नाही.यात अजून एक बाब स्पष्ट करणे गरजेचे आहे.राजकारणात उठवळ आणि नाठाळ असे लोक प्रत्येक पक्षात असतात.ते वाद निर्माण करतात.मग अचानक राजकीय वातावरण ढवळून निघते.या नाठाळांना सत्तेची ऊब घेत स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असते.बिनबुडाच्या लोकांना राजा लागतो.त्याची स्तुती करणे,त्यांची मर्जी सांभाळणे आणि त्यांच्या पुढे-पुढे जात रहाणे,या एकमेव उद्देशाने हे लोक प्रेरित असतात.वर्तमानात नगर जिल्ह्यात व कोपरगाव तालुक्यात या लोकांची मोठी मांदियाळी आहे.त्याला कोपरगाव शहरही अपवाद नाही.मग त्याला तालुका,शहरातील भाजप असो की राष्ट्रवादी,शिवसेना असो की काँग्रेस हे कोणीच अपवाद नाही.त्यामुळे हा शिमगा सुरु होणे हि जशी नेत्यांची गरज आहे तशी हि या उठवळांची गरज आहे हे समजून घेतले पाहिजे म्हणजे पुढील बाबी समजण्यास मदत होते.

गतवेळची नगरपरिषद निवडणूक हि असामान्य अशी झाली हे अनेकांना आठवत असेल.त्या वेळी विजय वहाडणे यांनी एकहाती प्रस्थापित पुढाऱ्यांपुढे मोठे राजकीय आव्हान निर्माण केले होते.व राज्यात सर्वाधिक मतदान मिळवून त्यांना दाती तृण धरण्यास भाग पाडले होते त्यामुळे या वेळीही हि स्थिती होऊ नये यासाठी हि विरोधी फळी आधीच सावध झाली असून वहाडणेंचा गत निवडणुकीपूर्वीची प्रतिमा कुठल्याही परिस्थितीत भंजन करण्याचे आव्हान त्यांच्या पुढे आहे.हे एकदा समजून घेतले की हा शिमगा का सुरु झाला ? हे समजणे सोपे जाईल.आता पर्यंत चार वर्षाच्या काळात नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या विरोधात त्यांचे विरोधक ठोस आरोप सप्रमाण सिद्ध करू शकलेले नाही.हि वहाडणे यांच्या कामाची मोठी जमेची बाजू आहे.असे वाऱ्यावरील आरोप सर्वच पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते करत असतात त्यात नवीन काही नाही.शरद पवारांच्या विरोधात ट्रक भर पुरावे देण्याच्या घोषणा करणारे अधिकारी आणि राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते या देशाने अनूभवले आहे.या राज्याने पाहिले आहे.मात्र सिद्ध करण्याच्या पातळीवर हे सर्व सपशेल अपयशी ठरल्याचे दिसून आले आहे.

नगर परिषदेने गत चार वर्षात जी कामे केली ती फार या व्याख्येत मोडणारी नाही हे खरे आहे.पण ज्यांनी आरोपांची मालिका सुरु केली आहे.त्यांनी आधी दीड वर्ष आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून ईशान्य गडाच्या दावणीला बांधलेले अधिकारी बसवून व पाशवी बहुमताच्या जोरावर त्यांना कामच करू दिले नाही हि बाब सुरक्षित करता येणार नाही.त्या महिला अधिकाऱ्यांच्या काळात काही कोटींचा निधी यांच्या राजवटीतील अनेक वर्ष प्रलंबित असलेले पाणी बिल व वीज बिलात जाणीवपूर्वक वळवून शहर विकासाला निधी शिल्लक राहणार याची पुरेपूर दखल घेतली होती.पालिकेत आधीच्या कालखंडात कृत्रिम रित्या अधिकारी आणि कर्मचारी यांची निर्माण केलेली कमतरता या बाबी दुर्लक्षित करता येणार नाही.राज्य पातळीवरील तत्कालीन भाजप नेत्यांचे कान भरून जेव्हढ्या-जेव्हढ्या अडचणी निर्माण करता येतील तेवढ्या-तेव्हढ्या त्यांनी केल्या तरीही हा किल्ला वहाडणे यांनी एकही नगरसेवक सोबत निवडून आलेला नसतांना एकट्याने लढवला आहे.हि बाबही दुर्लक्षित करता येणार नाही.येथे एक बाब स्पष्ट करणे गरजेचे वाटते.बरेच माध्यम मित्र नगराध्यक्ष वहाडणे यांची ओढुनताढुन तुलना माजी नगराध्यक्ष राजेन्द्र झावरे यांच्याशी करताना दिसतात मात्र येथे एकबाब विसरली जात आहे की,झावरे यांच्या पाठीमागे किमान मजबूत संघटन व बहुमतात नाही पण सेनेचे बरेच नगरसेवक होते.इथे नेमकी उलटी स्थिती आहे.वहाडणे यांना या दोन्ही पातळ्यांवर स्वतःच बाह्या वर करून लढावे लागत आहे.आहे त्या कार्यकर्त्याना त्यांनी मागील सत्ताधाऱ्यासारख्या निविदा देऊन पोसण्यास नकार दिला आहे.त्यामुळे नगरपरिषदेत मुख्याधिकारी व बांधकाम अभियंता यांच्या दालनात ठेकेदारांचे थवे या कालखंडात दिसले नाही.आरोप करणे सोपे आहे.मात्र ते पुराव्याच्या पातळीवर सिद्ध करणे अवघड आहे.या पातळीवर वहाडणे विरोधक अद्याप तरी यशस्वी ठरल्याचे दिसत नाही हे विशेष ! आता पाशवी बहुमतवाले आज आरोप करत असतील तर त्यांनी याचे उत्तर देणे गरजेचे आहे की,पालिकेला या चार वर्षात पाणी टंचाईला सामोरे का जावे लागले नाही.त्यावेळी जलसंपदाकडून मिळणारे पाणी आजही तेव्हढेच आहे.पाणीसाठवण करणारे तलाव तेच आहे.अधिकारी-कर्मचारी तेच आहे.मग काय जादू झाली की पाणी नियमित मिळत आहे.पिण्याच्या पाण्याची वास्तविकता सर्वांनी मान्य केली आहे.४२ कोटींची पाणी योजना करूनही गत सत्ताधाऱ्यांनी वितरण व्यवस्थेचे जाळे व साठवण तलाव का निर्माण केला नाही.या साठवण तलावातील पाणी चोरी का थांबवली नाही.आठ कोटी तर निव्वळ कमिशन पोटी कोणाच्या खिशात गेले,नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून बंद जलवाहिणीचा ८९ कोटींचा प्रस्ताव कुणी थांबवला ? यावर त्या-त्या वेळी लिहून झालेले आहे.त्याची पुनरावृत्ती करणे येथे गरजेचे वाटत नाही.सत्तेची मक्तेदारी निर्माण करून या पालिकेची सत्ता पिढ्यानपिढ्या आपल्या ताब्यात ठेवली त्यांनी काय दिवे लावले आहे हेही या पालिकेच्या कार्यक्षेत्रातील नागरिकांनी अनुभवले आहे.किमान पक्षी त्यांनी पिण्यास नियमित पाणी,शहर स्वच्छता,आरोग्य,रस्ते,रस्ते उजळून टाकणारे पथदिवे,नक्कीच दिले आहे.कचऱ्याचे व धुळीचे धुळगाव म्हणून ओळखले जाणारे कोपरगाव शहर व त्याची ओळखली जाणारी पालिका आज आरोग्य व शहर स्वच्छतेत देशपातळीवरील रांगेत आणून बसवली आहे.तिला पुरस्कार मिळवून दिले आहे.वीज बिलात किमान वर्षाला पंचवीस वर्षाची कमी आणली आहे.कोरोना नियंत्रण मिळवून नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे.आता रस्ते मंजुरी दिली आता हेच रस्ते झाले तर आपले काय ? हा पाशवी सत्ताधाऱ्यांना पडलेला गहण प्रश्न आहे.त्यामुळे त्यांच्या पोटात पोटशूळ उठला तर तो सुज्ञ नागरिकांनी नक्की ओळखून घेतला पाहिजे व या नक्रासुरांना मोठ्या दिलाने माफ केले पाहिजे.कोणत्याही परिणामांची तमा न बाळगता केवळ निवडणुका जिंकणे या आपल्या कडच्या कालातीत राजकीय संस्कृतीला आज तरी पर्याय दिसत नाही.झारखंड मुक्ती मोर्चाचे तत्कालीन खा.सुरज मंडल यांनी १९९३ साली निवडणुका आणि विविध पक्षाचे नेते याबाबत बोलताना म्हटले होते,”पैसे पोत्यातून आणले जातात,दोन महाकाय बैलांच्या झुंझीत आपण सामान्य माणसे काय करू शकतो ? राजकीय पक्ष आणि त्यांचे नेते आपल्या फायद्यासाठी सरड्याप्रमाणे निष्ठा बदलून एका पक्षातून दुसऱ्या पक्षात जातात.आणि सत्ता आणि पैसा यांच्यात अदलाबदल होते”.इथे वर्तमान पक्ष म्हणजे जहागिऱ्या बनल्या आहेत.एक मध्यवर्ती नेता त्याच्या सत्ताकांक्षा पूर्ण करण्यासाठी राजकीय पक्ष असे त्याचे स्वरूप.त्यांच्या तीन-तीन पिढ्या निवडणुकीच्या राजकारणात उतरलेल्या त्यामुळे जेष्ठ कार्यकर्त्याना या मिसरुट न फुटलेल्या तिसऱ्या पिढीतील या नेत्यांना सलाम करावा लागतो या इतके दुर्दैव नाही.यांच्या कडील एक अवैध दारू व्यवसायातील पैसा वगळला तर यांच्याकडे दुसरे काय आहे हो ! हा पैसा यांना जनतेसाठी काही उभे करण्यापेक्षा दुसऱ्याचे उध्दवस्त करण्यासाठीच वापरला जातो.वहाडणे हे एक व्यक्ती नाही विचार आहे असे म्हणून पाहिले तर यांना गत पाच दशकापासून वहाडणे यांना का उध्वस्त करायचे आहे याचे उत्तर जसे संवत्सर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत मिळते तसे जवळके,सांगवी भुसार,पोहेगाव ग्रामपंचायत निवडणूकीत मिळते.तेच उत्तर अंचलगाव ग्रामपंचायत निवडणुकीत स्व.रमेश शिंदे हे हयात असतांना मिळत होते.कोपरगावात जे काही नवा विचार उभा राहतो हा या सत्ताधाऱ्यांना मोडून टाकायचा आहे.हा विचार यांचे संस्थाने खालसा करील याची साधार भीती वाटते.व भीती दूर ठेवण्यासाठी जे-जे करता येईल ते-ते हि मंडळी करत आहे.आता यांच्या राजकीय वाटचालीत यांना आपल्या कार्यकर्त्यांवरही विश्वास राहिला नाही त्यामुळे त्यांच्या गव्हाणीला बांधलेले कार्यकर्ते,कर्मचारी,अधिकारी,जवळचा नातलग आदींचा वापर यांनी करण्यास प्रारंभ केला आहे.कोपरगावसाठी असाच चेहरा त्यांना अध्यक्षपदी हवा आहे.एकाधिकार शाही राबविणाऱ्या सत्ताधीशात आतून जो भयगंड असतो तो या नेत्यांत आतून ठासून भरलेला आहे.नाकासमोर चालणाऱ्यांच्या हातात काही मिळत नाही.उलट चालता-चालता समोरच्याचे नाक दाबून तोंड उघडायला लावणे म्हणजे राजकारण असे यांचे राजकीय समीकरण आहे.तर यांच्या लेखी निसंधिग्धतेपेक्षा संधिग्धता निर्यायक ठरत असते.त्यामुळे या आगामी काळात नगराध्यक्ष विजय वाहाडणे यांच्या भोवती संधिग्धततेचे जाळे उभे करून आपला डाव साधायचा आहे.याखेरीज त्यांना तालुक्यातील प्रबळ स्थानिक स्वराज्य संस्थांत आपल्या इशाऱ्यावर नाचणारा बाहुला बसला की या संस्थांतून निर्माण होणाऱ्या ताकदीतून पुन्हा एकदा दुसरा वहाडणे पैदा व्हायला नको याची हि मंडळी दक्षता घेत आहे.हाच या विरोधाचा मतितार्थ आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close