जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरगावच्या गणेश मंडळांनी ऑनलाईन अर्ज सादर करा-पो.नि.लोखंडे

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव (प्रतिनिधी)

कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांचे आदेशान्वये गणेशोत्सवासाठी आवश्यक परवाने वेळेआधी काढून घ्यावे व पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी जनशक्ती न्युजशी बोलताना केले आहे.

दिनांक २ सप्टेंबर ते दिनांक १२ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव हा सण उत्सव साजरा होत आहे. गणेशोत्सवासाठी ऑनलाइन फॉर्म भरून परवाने देणे संदर्भात नुकत्याच कृष्णाई मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सूचना देण्यात आलेल्या आहेत

त्यानी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की,राज्याचे पोलीस महासंचालक यांनी आगामी गणेशोत्सव शांततेत पार पडावा या साठी काही नियम घालून दिले आहेत.त्याचें आदेशान्वये दिनांक २ सप्टेंबर ते दिनांक १२ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव हा सण उत्सव साजरा होत आहे. गणेशोत्सवासाठी ऑनलाइन फॉर्म भरून परवाने देणे संदर्भात नुकत्याच कृष्णाई मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सूचना देण्यात आलेल्या आहेत तरी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणेश मंडळांनी आपले गणेश मंडळाचे नावाने वेळेत www.mhpolice.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर जाऊन सर्व आवश्यक कागदपत्रासह ऑनलाइन फॉर्म सादर करावेत. व आपल्या गणेश मंडळांची गैरसोय टाळावी. ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर त्यांना परवाने देणे सोयीस्कर होणार असल्याचेही पोलीस निरीक्षक लोखंडे यांनी शेवटी सांगितले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close