कोपरगाव तालुका
आत्मा मालिक गुरुकुलात अवतरली ‘गोकुळ नगरी’
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगांव (प्रतिनिधी )
कोपरगाव तालुक्यातील कोकामठाण ग्रामपंचायत हद्दीतील आत्मा मालिक ध्यानपीठ संचलित, आत्मा मालिक माध्यमिक व उच्च माध्यमिक गुरुकुलात दहिहंडी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
भगवान विष्णूंनी पृथ्वीवरील कंस मामाचा अन्याय अत्याचार या पासून जनतेची सुटका करण्यासाठी श्री कृष्णरूपात गोकुळात जन्म घेतला असल्याचे मानले जाते.या दिवशी कृष्णाष्टमी साजरी केली जाते.मथुरा ,वृंदावन,गोकुळात ह मोठा उत्सव साजरा केला जातो.दुसऱ्या दिवशी या उत्सवाची सांगता विशिष्ट पदार्थांनी काला करून होते. तो गोपाळकाला म्हणून गणले जातो.
हा उत्सव आत्मा मलिक गुरुकुलातही आज मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
या प्रसंगी गुरुकुलाचे प्राचार्य निरंजन डांगे, विभाग प्रमुख रमेश कालेकर, पर्यवेक्षक बाळासाहेब कराळे, रविंद्र देठे व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. दरम्यान प्रारंभी बालश्रीकृष्णाची वाजत -गाजत मिरवणुक काढण्यात आली व श्रीकृष्ण पुजन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी बालनृत्याविष्कार सादर केला. याप्रसंगी सर्वत्र श्रावणाने चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते.
सदर कार्यक्रमात दहिहंडी फोडण्याची स्पर्धा मराठी विभागातील व सेमी इंग्रजी माध्यमाच्या इ. १० वी च्या गोविंदा पथकामध्ये लावण्यात आली होती. सदर स्पर्धेत मराठी माध्यमाचा गोविंदा पथक विजयी ठरला. त्यानंतर प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना गोकुळाष्टमीचे महत्त्व पटवून दिले.शेवटी विद्यार्थ्यांना गोपाळकाल्याचा प्रसाद वाटप करुन कार्यक्रमाची सांगता झाली.
सदर कार्यकमाचे सूत्रसंचलन मनिषा गोंदकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गुरुकुलातील सर्व अध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.