जाहिरात-9423439946
नगर जिल्हा

नगराध्यक्ष वहाडणे यांचा भाजपकडे उमेदवारीचा दावा ! कोपरगावात खळबळ ?

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)

कोपरगाव विधानसभा मतदारसंघाची निवडणूक तोंडावर आली असून आता भाजप-शिवसेना या पक्षांची युती होणार की नाही या बाबत राज्यात चर्वीत-चर्वण सुरु असताना कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी मात्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची थेट फुलंब्रित (बागडे यांचा मतदार संघात ) भेट घेऊन आपला भाजपच्या निष्ठावानात प्रथम दावा असल्याचा शड्डू ठोकल्याने सत्ताधारी आ.कोल्हे गटात खळबळ उडाली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,राज्यात आगामी ऑक्टोबर महिन्यात निवडणूका संपन्न होत आहेत.त्यासाठी मतदार याद्यांना अखेरचा हात मारण्याचे काम राज्य निवडणूक आयोगाकडून सुरु आहे.तर राज्य सरकार व ज्या त्या मतदार संघाचे आमदार,मंत्री-संत्री हे आपण गत पाच वर्षात काय दिवे लावले (!) याची जाहिरात करण्यात व केलेल्या न केलेल्या कामाचे उदघाटने करण्यात दंग असून स्वस्तात फेक्स लावून (वर्तमान पत्रांना जाहिराती न देता पेपरात पत्रके घुसडून ) स्वतःला शेंदूर फासून घेण्यात गर्क आहे. कोपरगाव सह राज्यातील रस्त्यांवर खड्ड्यांचा महापूर आला असून या खड्ड्यांमुळे व महापुरामुळे अनेक नागरिकांचे बळी गेले आहे.राज्यातील विरोधीपक्ष कोमात गेला असून त्यांच्याकडे नाव घ्यावा असा प्रभावी नेता उरलेला नाही.

कोपरगावात तर विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करणारे कामाऐवजी पाच वर्षे झालेल्या भ्रष्टाचारामुळेच चर्चेत अधिक आहेत.तालुक्यातील रस्त्यांवर खड्डे मावत नसताना हे नेते मंडळी आम्ही रस्त्यांवर पावणेदोनशे कोटी रुपयांचा निधी आणल्याचा हाष्यास्पद दावा करून आपले आणखी हसू करून घेत आहे.कोपरगावचा मतदारसंघ हा अवैध वाळू उपसा त्याचे नेत्यांनी घेतलेले ठेके स्मशानशेड मध्ये झालेला गफला,रस्त्यांची दुरुस्ती न करताच काढलेली कोट्यावधींची बिले, जलसंपदाच्या कालव्यांची व चाऱ्यांची दुरुस्ती न करताच लाटलेली माया,यामुळेच जास्त चर्चेत आहेत.

निळवंडेच्या १८२ दुष्काळी गावातील शेतकऱ्यांचे शेतीसिंचनाचे पाणी लाभक्षेत्राबाहेर पळविण्याचे षडयंत्र आखून त्यासाठी मुख्यमंत्री,जलसंपदामंत्री,जलसंपदा राज्यमंत्री यांना दावणीला बांधलेले दुर्दैवाने पाहण्यास मिळाले असून अधिकाऱ्यांचा या बेकायदेशीर कृत्यास विरोध असताना व शेतकऱ्यांवर अन्याय होणार असल्याचे लेखी शेरे मारूनही तीन-तीन वेळेस ठराव बदलण्यास भाग पाडले असल्याने दुष्काळी जनतेचा या नेत्यांनी केवळ आपल्या दारू कारखान्यांना अधिकचे पाणी मिळावे या अट्टाहासापायी दिवासाढवळ्या विश्वासघात केल्याचे उघड झाले आहे.त्यातच विरोधी पक्ष नेत्याने या दुष्काळी जनतेची बाजू विधानसभेत मांडणे गरजेचे असताना राज्याचा सत्ताधारी प्रमुखच विरोधी पक्षनेत्याने आपल्या दावणीला बांधल्याचे दुर्दैवी चित्र कधी नव्हे तो या राज्याला पाहायला मिळाले.या बाबत निळवंडे कालवा कृती समितीनेच प्रथम भंडाफोड करूनही ना काँग्रेसने दखल घेतली ना राष्ट्रवादीने.परिणाम आज समोर आहेच ऐन वाढीच्या वेळी या आघाडीकडे आता माणसे औषधाला उरलेली दिसत नाही.पाठीशी असलेले लष्कराचे बळ काढून भाजपने आघाडीच्या वरिष्ठ नेत्यांना पार… कंगाल करून टाकले आहे.आज यांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यात माय लेकराला धरत नाही असे चित्र तयार झाले आहे.हे केवळ एका फितूर बिभीषणामुळे झाले याची थोडीशी जाण तात्कालिन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना होती मात्र त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने काँग्रेसची तर वाट लागलीच पण राष्ट्रवादीने आपलीही ,”सनम हम भी डुबेंगे सनम” अशी करून घेतली आहे.

आज नगर जिल्ह्यात या पक्षांना उमेदवार मिळणे मुश्किल होणार आहे.अनेक आघाडीतील मासे केवळ रोगराईच्या भीतीने माणसे आपोआप मरावे तसे सरकार आपल्यावर कारवाई करील या भीतीने भाजपकडे पळत सुटले आहेत.कोपरगाव तालुकाही त्याला अपवाद नाही.

हा अनुभव या मतदार संघाचे पाच वर्षे आधीच घेतला आहे.या निवडणुकीत आघाडीचे उमेदवार येथे आता औषधाला सापडणार नाही असे सार्वत्रिक चित्र आहे.सापाला विष पाजल्यावर काय होते त्याचा दाहक अनुभव काँग्रेस आता घेत असेल.राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी या राजकीय नाट्याकडे दुर्लक्ष केल्याने काँग्रेस जात्यात तर ते सुपात होते इतकाच काय तो फरक.

राहाता राहिला कोपरगाव तालुक्याचा प्रश्न या तालुक्यात भाजपने केलेल्या तीनही गोपनीय सर्वेत येथील भाजपची जागा पडीची असल्याचा निष्कर्ष काढला असून त्यांच्या आर.एस.एस.च्या निष्ठावान पाईकांनी हि जबाबदारी निष्ठने पार पाडली आहे.

लोकसभा निवडणुकीतच आपण व देशाने पहिले भाजपची जागा अथवा उमेदवार जेथे-जेथे धोक्यात आहे असे अहवाल आले त्या-त्या ठिकाणी त्यांनी नवीन उमेदवार दिले व असे जवळपास २५४ नवखे खासदार निवडून आणले.याचाच अर्थ भाजप बहुमतासाठी धोका पत्करण्यास तयार नाही.महाराष्ट्र हे राज्य तर एकूण देशाच्या उत्पन्नात जवळपास चाळीस टक्केचा महसूल देनारे असा लौकिक असणारे इतके महत्वपूर्ण आहे. असे असताना भाजप पडीच्या व स्वतःचा पाचही वर्ष स्वार्थ पाहणाऱ्या नेत्यांना अथवा विद्यमान आमदारांना उमेदवारी देण्याची सुतराम शक्यता नाही.त्या ऐवजी विखेंना जर नगर जिल्ह्यातील उमेदवारीचा शब्द दिलेला असेल (आहेच )तर भाजपची उमेदवारी हि विद्यमान राष्ट्रवादीचे आशुतोष काळे यांनाच बहाल होणार आहे.हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे.तथापि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या सारखे जर त्यांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांना केवळ वापरून घेण्याचा फंडा वापरला तर कोपरगावची उमेदवारी आपोआप नगराध्यक्ष विजय वहाडणे यांचेकडे सरकणार आहे.कारण भाजपचा एक गट या निवडणुकीत आघाडीचे नेते फोडून त्यांचा केवळ वापर करून भाजपच्या निष्ठावानांसाठी ( ज्यांनी आपले पक्षासाठी आयुष्य वेचले अशांसाठी ) आग्रही आहे हे येथे विसरता येणार नाही.

भाजपचा एक गट या निवडणुकीत आघाडीचे नेते फोडून त्यांचा केवळ वापर करून भाजपच्या निष्ठावानांसाठी ( ज्यांनी आपले पक्षासाठी आयुष्य वेचले अशांसाठी ) आग्रही आहे हे येथे विसरता येणार नाही.

त्यात भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष व माजी खा.स्व.सूर्यभान पाटील वहाडणे यांचे राज्यात भाजप उभारणीतील योगदान तथा भाजपचा इतिहास पूर्ण होणार नाही.विद्यमान विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे व विद्यमान केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे दोन्ही नेते माजी.खा.वहाडणे यांचे कार्यकर्ते होते.किंबहुना त्यांना माजी.खा.वहाडणे यांनीच घडवले होते.हे येथे विसरता येणार नाही.माजी.खा.वहाडणे यांच्या अंत्यविधी समयी तत्कालीन आमदार व विद्यमान सभापती हरिभाऊ बागडे यांचे सन-२००८ चे श्रद्धांजलीचे भाषण ज्यांनी ऐकले असेल त्यांना दुसरा पूरावा देण्याची गरज वाटत नाही.

माजी.खा.वहाडणे यांच्या अंत्यविधी समयी तत्कालीन आमदार व विद्यमान सभापती हरिभाऊ बागडे यांचे सन-२००८ चे श्रद्धांजलीचे भाषण ज्यांनी ऐकले असेल त्यांना दुसरा पूरावा देण्याची गरज वाटत नाही.

त्यामुळे कोपरगावात खरी लढत युती झाली नाही तर सेनेच्या उमेदवार म्हणून आ. स्नेहलता कोल्हे (सेनेच्या राज्य मंत्र्याच्या कोट्यातून) या तर भाजपची पहिले प्राधान्य (विखे गटाचे उमेदवार म्हणून)आशुतोष काळे हे राहणार आहे.मंत्री राधाकृष्ण विखेंचा भाजपने राणे करावयाचा ठरवला तर मात्र भाजपची उमेदवारी हि विजय वहाडणे यांनाच राहणार आहे.व ते काळे-कोल्हे या दोन राजकीय रेड्यांच्या (निरर्थक )शर्यतीत कोपरगाव विधानसभा मतदार संघात बहुमताने निवडुन आले तर आश्चर्य वाटावयास नको ! मंत्री रावसाहेब दानवे व विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या विजय वहाडणे यांच्या भेटीचा हा मतितार्थ इतकेच या निमित्ताने.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close