कोपरगाव तालुका
महापुर नुकसानीची व्यावसायिकांना भरपाई द्या-काळे
संपादक-नानासाहेब जवरे
कोपरगाव (प्रतिनिधी)
गोदावरी नदीतून कोपरगाव शहरात तीन ऑगष्ट रोजी महापुरामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून त्यांनाही नुकसान भरपाई अशी महत्वपूर्ण मागणी राष्ट्रवादीचे नेते आशुतोष काळे यांनी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचेकडे नुकतीच एका निवेदनाद्वारे केली आहे.
आशुतोष काळे यांनी दिलेल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की, गोदावरी नदीला आलेल्या महापुराचे पाणी कोपरगाव शहरातील ३८५ दुकानांमध्ये शिरले होते. त्यामुळे या दुकानांमधील व्यावसायिकांचा मालाचे नुकसान होऊन फर्निचर भिजल्यामुळे या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून हे पुन्हा वापरण्या योग्य राहिलेले नाही. एकीकडे व्यवसायात मंदी व दुसरीकडे महापुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीमुळे व्यापाऱ्यांना नवीन माल खरेदी करून नव्याने फर्निचर तयार करावे लागणार आहे. महापुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या सर्व दुकानांचा पंचनामा झाला असून आजपर्यंत व्यावसायिकांना कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. ज्याप्रमाणे कोल्हापूर, सांगली या ठिकाणी नुकसान भरपाई देण्यात येत आहे त्याप्रमाणे आम्हालाही लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी असे दिलेल्या निवेदनात पूरग्रस्त व्यापाऱ्यांनी म्हटले आहे.
गोदावरी नदीला आलेल्या महापुराचे पाणी कोपरगाव शहरातील ३८५ दुकानांमध्ये शिरले होते. त्यामुळे या दुकानांमधील व्यावसायिकांचा मालाचे नुकसान होऊन फर्निचर भिजल्यामुळे या व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले
सदर प्रसंगी सुनील गंगूले, सुनील शिलेदार,रमेश गवळी, राहुल देवळालीकर, संतोष शेलार,रावसाहेब साठे, कैलास उदावंत, पियुष विसपुते,अक्षय भडकवाडे, अंबादास निकुंभ, प्रकाश दुशिंग, प्रकाश बोरसे, सुभाष विसपुते, देविदास विसपुते, योगेश उदावंत, अमित पोरवाल, मनोज विसपुते, कैलास कदम, दीपक वर्मा, अनिल आमले, दिलीप हिंगमीरे, सुनील आमले, अनवर शेख, सचिन विसपुते, नितीन निकुंभ, वीरेंद्र विसपुते, गुरूदीप सिंग, शिवाजी कदम, अल्ताफ शेख, मोहन यशवंत, भाऊसाहेब सुपेकर, बापू कुंदे, अब्बास शेख, विजय बाविस्कर, महावीर सोनी, किरण वडनेरे, विठ्ठल धुमाळ, संतोष परदेसी, दिलीप उकिरडे, विमलकुमार गुप्ता,सचिन भडकवाडे, अविनाश भडकवाडे आदी उपस्थित होते.