जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कोपरंगावतील पूरग्रस्तांना त्वरित मदत द्या-वहाडणेंची मागणी

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगांव( प्रतिनिधी)

कोपरगाव शहरात आलेल्या गोदावरी नदीच्या महापुरामुळे विविध भागांतील नागरिकांचे, व्यापाऱ्यांचे,दुकानदारांचे मोठ्या प्रमाणांत नुकसान झालेले असून त्यांना अद्याप मदत मिळालेली नाही सदरच्या नागरिकांचे हाल होत असल्याने शासनाने त्वरित मदत करावी अशी मागणी कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी कोपरगावचे तहसीलदार योगेश चंद्रे यांचेकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.

दरम्यान आज दुपारी तहसील कार्यालयात पूरग्रस्तांची यादी लागल्याची कुणकुण नागरिकांना लागल्याने त्यांनी तहसील कार्यालयात मोठी गर्दी केली होती त्यात आपद्ग्रस्तांऐवजी भलतीच नावे आल्याने मोठा गोंधळ उडाला होता या बाबत आमच्या प्रतिनिधीने तहसीलदार योगेश चंद्रे यांचेशी संपर्क साधला असता त्यांनी भ्रमणध्वनी उचलला नाही त्यामुळे अधिकची माहिती उपलब्ध झाली नाही.

कोपरगाव शहरात तीन ऑगष्ट रोजी मोठा पूर आला होता गोदावरी नदीत सुमारे पावणेतीन लाखांहून अधिक क्युसेसने पाणी सोडण्यात आले होते.सदरचे पाणी मोठ्या प्रमाणात खंदकनाल्याद्वारे शहरात घुसले होते त्यामुळे मुख्य रस्ता,बस स्थानक परिसर,संजयनगर,सुभाषनगर,कर्मवीरनगर,खा.वहाडणे घाट परिसर,आदी परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी घुसलेले होते त्यामुळे अनेकांचे प्रपंच रस्त्यावर आले होते.त्या संदर्भात महसूल विभागाने पंचनामे केले मात्र अद्याप या आपदग्रस्तांना मदत मिळाली नाही.हि अत्यंत खेदाची बाब आहे.या घटनेने अनेकांचे व्यवसाय बंद पडून रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. पंचनामे होऊनही आजवर नुकसान भरपाई मिळालेली नाही. शासनाने त्वरित निर्णय घेऊन लवकरात लवकर पूरग्रस्त व्यापाऱ्यांना मदत देणे अत्यंत गरजेचे आहे. व्यवसाय पूर्ववत होण्यासाठी मिळणारी मदत वेळेवर मिळाली पाहिजे अशी मागणी नगराध्यक्ष विजय वहाडणे यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त व्यापाऱ्यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांचेकडे केली आहे.

यावेळी नरेंद्र मोदी विचार मंचचे विनायक गायकवाड, नगरसेवक मेहमूदभाई सय्यद, संजय कांबळे, वसंत जाधव, रविंद्र बागरेचा, प्रभाकरजी वाणी, किरण थोरात, सुभाषजी खैरे, निलेश कांबळे, रमेश लकारे, श्री.सोनवणे, जॉय, वाकचौरे आदी. मान्यवर उपस्थित होते. या मागणीचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकारी यांनाही पाठविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close