जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

आजी-माजी सैनिकांची घरपट्टी कोपरगाव पालिकेने केली माफ!

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगांव प्रतिनिधी- कोपरगाव नगरपरिषदेच्या दि. २० जुलै रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी विषय पत्रिकेत प्राधान्‍याने विषय घेऊन “कोपरगाव शहरातील सर्व आजी व माजी सैनिकांना घरपट्टीत पूर्णपणे सवलत” देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला असल्याची माहिती स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजित ध्वजारोहण प्रसंगी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.

त्यावेळी पुढे बोलताना ते म्हणे की,या बाबत मागील वर्षी राज्य शासनाकडे तसा प्रस्तावही पाठविण्यात आला होता, पण शासनाकडून त्याविषयी कुठलेच उत्तर किंवा मार्गदर्शन मिळालेले नाही. म्हणून कोपरगाव नगरपरिषदेने सर्वसाधारण सभेत हा विषय सर्वानुमते मान्य करून एकप्रकारे राष्ट्रीय कर्तव्यच पार पाडले आहे.
देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर सतत दक्ष असलेल्या सैनिक बांधवांच्या परिवारासाठी आपलेही काही योगदान असणे गरजेचे आहे. त्यासाठी आपण नगराध्यक्ष म्हणून या विषयाचा पाठपुरावा केला. खरे तर कोपरगाव नगरपरिषदेच्यावतीने आजी माजी सैनिकांच्या परिवारासाठी ही “रक्षाबंधनाची भेट” ठरणार आहे. कोपरगावच्या आजी माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारीही याबाबत सातत्याने पत्राद्वारे, भेटीद्वारे कोपरगाव नगरपरिषदेच्या संपर्कात होते. शहरातील नागरिकांनीसुद्धा आपल्या शेजारी, आसपास राहणाऱ्या सैनिकांच्या- परिवारांच्या सुखदुःखात सामील झाले पाहिजे. कारण ज्या परिवारातील कर्ता पुरुष सिमेवर देशाच्या व जनतेच्या संरक्षणासाठी उभा आहे, त्या सैनिकांच्या कुटुंबाला आधार देणे आपले सर्वांचे कर्तव्यच मानले पाहिजे असे प्रतिपादन नगराध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी केले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close