जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

राजेंद्र झावरे यांच्या मुलावर जीवघेणा हल्ला,कोपरगावात चौघांवर गुन्हा दाखल

जाहिरात-9423439946

संपादक-नानासाहेब जवरे

कोपरगाव(प्रतिनिधी)कोपरगाव नगरपरिषदेचे माजी अध्यक्ष तथा शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे यांचे चिरंजीव निशांत राजेंद्र झावरे यांच्यावर टिळकनगर या उपनगरातील आरोपी अनिल माधव वैरागळ, शुभम दुशिंग व अन्य दोघे अनोळखी आरोपी अशा चौघांनी शुक्रवारी दि.१६ ऑगष्टच्या रात्री दहाच्या सुमारास बस स्थानाकासमोर चाकुसारख्या धारदार हत्याराने हल्ला केला असून या हल्ल्यात फिर्यादी निशांत झावरे हा जखमी झाला असल्याची माहिती कोपरगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी आमच्या प्रतिनिधीस दिली आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की, कोपरगाव येथील रहिवासी तरुण निशांत झावरे हा १६ऑगष्टच्या रात्री दहा वाजेच्या सुमारास चहा घेण्यासाठी कोपरगाव बस स्थानकासमोरील मंगेश यांच्या चहाच्या टपरीवर गेला असता व तेथे चहा साठी उभा असताना आरोपी अनिल वैरागळ याने त्यास शिवीगाळ सुरु केली असता तेवढ्यात त्याचा दुसरा सहकारी शुभम दुशिंग याने तेथे येऊन वाद घातला तेवढ्यात आरोपी अनिल वैरागळ याने ज्युपिटर स्कूटरच्या डिकीतून चाकुसारखे
हत्यार काढून निशांत झावरे याच्या पाठीवर, डाव्या हाताच्या खांद्यावर वार करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणखी अनोळखी दोघांनी तेथे येऊन झावरे यास मारहाण करण्यात मदत केली असल्याची फिर्याद निशांत झावरे याने कोपरगाव शहर पोलीस ठाणे येथे येऊन रात्रीच्या सुमारास दिली आहे.
या प्रकरणी कोपरगाव शहर पोलिसांनी गु.र.नं.२७९/२०१९ भा.द. वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६ अन्वये या चौघा आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दरम्यान शहरात परिस्थिती तणावपूर्ण मात्र नियंत्रणात असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान प्रमुख आरोपी हा मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती उपलब्ध झाली असून घटनास्थळी आरोपीने समजविणाऱ्या स्वतःच्या आईला व घरातील अन्य नातेवाईकांनाही शिवीगाळ केल्याचे वृत्त आहे.

दरम्यान त्यातील एक आरोपी शुभम दुशिंग यास कोपरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले बाकी आरोपींच्या शोधात पोलीस आहेत.तर प्रमुख आरोपी अनिल वैरागळ मात्र फरार होण्यात यशस्वी झाला आहे.तथापि सदरची घटना गैरसमजातून झाली असून जखमीस खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. माहितगार सूत्रांनी दिली आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हे.काँ. राजेंद्र पुंड हे करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close