कोपरगाव तालुका
कोपरगावातील गोवंश हत्या थांबवा अन्यथा जागा ताब्यात घेऊ-इशारा
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरात भर वस्तीत सुरु असलेला अवैध गोवंश हत्या या व्यावसायिकांनी तातडीने बंद कराव्या या अवैध व्यवसायामुळे शहरातील कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते त्यामुळे पालिकेचे आदेश या नागरिकांनी पाळले नाही तर त्यांच्या जागा नगरपरिषद पुन्हा ताब्यात घेईल असा इशारा कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी दिला आहे.
गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार फक्त म्हैस वर्गातील प्राणीच कापण्याची परवानगी आहे.पण दुर्दैवाने कोपरगावातील अनेक कसाई कायदे-नियम धाब्यावर बसवून संजयनगर परिसरात सर्रास गोवंश हत्त्या करत आहेत.खरे तर मांस विक्री करण्यासाठी नगरपरिषदेने त्यांना सोयिस्कर जागाही उपलब्ध करून दिलेली असताना काही व्यक्ती अनाधिकृत गोवंश कत्तल करत असून सामाजिक शांतता भंग करण्याचे काम करत आहे हे दुर्दैव आहे-विजय वहाडणे-नगराध्यक्ष
बैल,गाय आदी पशु अनादि काळापासून शेतीसाठी उपयुक्त व महत्त्वाचा प्राणी मानला जातो.दारात गाय,म्हैस किंवा अगदी शेळी तरी असणे हे त्या कुटुंबाच्या भरलेपणाचे लक्षण मानले जाते.बैलजोडी दारात असणे म्हणजे समृद्धीचे लक्षण मानले जाते.शेतकरी पोटच्या मुलाइतकेच गोठय़ातल्या जनावरांना जपतो.ही भारतीय समाजाची प्राण्यांवर प्रेम करण्याची मानसिकता आहे,परंपरा आहे.त्यातूनच भाजप सरकारने राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा मंजूर करून घेतला होता.मात्र त्याची अंमलबजावणी पुरेशा प्रमाणात होत नाही हिबाब वारंवार निष्पन्न होत आहे.याचा दाहक अनुभव नुकताच कोपरगाव नगरपरिषद हद्दीत नुकताच आला आहे.शहरातील संजयनगर परिसरात शहर पोलिसांनी अवैध गोवंश कत्तल रंगेहात पकडली आहे.त्यामुळे कोपरगाव हसहरात खळबळ उडाली आहे.या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष विजय वाहाडणे यांनी एक प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीस दिले आहे.
त्यात त्यांनी पुढे म्हटले आहे की,”भरवस्तीत असलेल्या संजयनगर भागातील कसाईखान्यामुळे शहराचे आरोग्य बिघडू नये यासाठी तो शहराच्या बाहेर नेलेला आहे.कोपरगाव नगरपरिषदेने जवळजवळ एक कोटी रुपये खर्च करून मनाई भागात कसाईखाना उभारला आहे.अनेक वर्षे बंद असलेले हा कत्तलखाना आपण या नागरिकांसाठी प्रयत्नपूर्वक सुरू करून घेतले आहे.परवानगी आणण्यासाठी स्वतः अधिकारी व कसाई लोकांना घेऊन अहमदनगरला गेलो.अधिकृतपणे व्यवसाय करता यावा,गोवंश हत्या होऊ नये यासाठी हे सर्व केले आहे.गोवंश हत्याबंदी कायद्यानुसार फक्त म्हैस वर्गातील प्राणीच कापण्याची परवानगी आहे.पण दुर्दैवाने कोपरगावातील अनेक कसाई कायदे-नियम धाब्यावर बसवून संजयनगर परिसरात सर्रास गोवंश हत्त्या करत आहेत.खरे तर मांस विक्री करण्यासाठी नगरपरिषदेने त्यांना सोयिस्कर जागाही उपलब्ध करून दिलेली आहे.नगरपरिषदेने सहकार्य करूनही अधिकृत कत्तलखाण्याचा वापर होणार नसेल,गोवंश हत्त्या करून जनतेच्या भावना दुखवून मग्रुरी चालूच राहणार असेल,आरोग्य धोक्यात येत असेल तर नगरपरिषदेने दिलेल्या जागा ताब्यात घेण्यात येतील.राजकिय नेते गोवंश हत्या होत असूनही,जनतेचे आरोग्य धोक्यात येऊनही बोलणार नाहीत.त्याचे कारणही सर्वांना माहित आहे.नगरपरिषद प्रशासनाला अंधारात ठेवून रात्री अपरात्री होणारी गोवंश हत्त्या थांबली नाही तर शहरातील सामाजिक सलोखा बिघडू शकतो याचे भान सर्वांनीच ठेवण्याची गरज आहे.
कोपरगाव नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी शहराचे आरोग्य व्यवस्थित राखण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत असताना मोजके काहीजण (कसाई) मनमानी करत असतील तर ते सहन केले जाणार नाही असा इशाराही अध्यक्ष विजय वहाडणे यांनी शेवटी दिला आहे.