गुन्हे विषयक
कोपरगावात महिलेचा विनयभंग,दोघांवर गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव शहरातील इंगळेनगर परिसरातील ३४ वर्षीय महिलेचा त्याच भागातील आरोपी नितीन धोंडीराम पवार,विद्या नितीन पवार दोन्ही रा.इंगळेनगर, कोपरगाव यांनी घराबाहेर ओढून त्या महिलेचा विनयभंग केला असल्याची फिर्याद दाखल झाल्याने कोपरगाव शहर परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी आरोपींवर गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी महिला व दोन्ही आरोपी नितीन धोंडीराम पवार,विद्या नितीन पवार हे शेजारी-शेजारी रहिवाशी असून सोमवार दि.०४ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास आरोपी हे या फिर्यादी महिलेच्या घरात घुसले व त्यांनी तिस घराचे बाहेर ओढुन काढुन आरोपी विद्या पवार हिने तिचे केस पकडुन तिस खाली पाडुन तिस लाथाबुक्यांनी मारहाण करुन विनयभंग केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की.फिर्यादी महिला व दोन्ही आरोपी नितीन धोंडीराम पवार,विद्या नितीन पवार हे शेजारी-शेजारी रहिवाशी असून सोमवार दि.०४ जानेवारी रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास आरोपी हे या फिर्यादी महिलेच्या घरात घुसले व त्यांनी तिस घराचे बाहेर ओढुन काढुन आरोपी विद्या पवार हिने तिचे केस पकडुन तिस खाली पाडुन तिस लाथाबुक्यांनी मारहाण केली तसेच आरोपी नितीन पवार याने तिचा गाउन फाडुन तिचे गळ्यावर तसेच पाठीवर चावा घेवुन तिचा विनयभंग केला आहे.तसेच दोघांनीही तिस घाण-घाण शिवागाळ करुन तिस जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.अशा फिर्याद महिलेच्या तक्रारी वरुन गुन्हा कोपरगाव शहर पोलिसांनी आपल्या दप्तरी दाखल केला आहे.दरम्यान फिर्यादी महिलेला उपचाहरार्थ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कोपरगाव शहर पोलिसांनी या प्रकरणी गु.र.क्रं.०७/२०२१,भा.द.वि.कलम ४५२,३५४(ब)३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार एस.सी.पवार हे करीत आहेत.