जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

सावित्रीचा ज्ञानदीप तेवत ठेवा-माजी प्राचार्या सरवार

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले शिक्षण क्षेत्रात खडतर परिस्थितीत केलेले कार्य महिला व मुलींसाठी प्रेरणादायी असून प्रत्येक शिक्षिकेने हे काम प्रामाणिकपणे, जिद्द आणि चिकाटीने पुढे चालत ठेवून सावित्रीचा हा ज्ञानदिप अखंड तेवत ठेवण्याचे काम करावे असे आवाहन सेवानिवृत्त प्राचार्य ललिता सरवार यांनी एका कार्यक्रमात बोलताना केले आहे.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस वर्पे परिवाराच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे-संदीप वर्पे,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष

भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाच्या महाविकास आघाडी सरकारने सावित्रीबाई फुले यांच्या जयंती सोहळा हा उत्सव रूपाने सर्वत्र साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्याचाच एक भाग म्हणून सेवानिवृत्त माजी प्राचार्य गोरक्षनाथ वर्पे व आदर्श सेवानिवृत्त शिक्षिका प्रमिलाताई वर्पे यांचे विचार प्रेरणेतून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे यांच्या पुढाकाराने वर्पे परिवाराच्या वतीने कोपरगाव नगरपरिषद शिक्षण मंडळ शाळेतील सर्व महिला शिक्षकांचा गौरव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी त्या अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ नागरिक सेवा मंचचे कार्याध्यक्ष विजयजी बंब,एस जी विद्यालयाचे विश्वस्त संदिप अजमेरे,माजी नगरसेविका रमाबाई पहाडे, भारत सरकारचे स्वच्छतादूत सुशांत घोडके,नगरसेविका प्रतिभा शिलेदार,नगरसेवक मंदार पहाडे,पिपल्स बँकेचे संचालक सुनील शिलेदार,आनंद जगताप,रवींद्र चिंचपुरे,लक्ष्मण सताळे,रवींद्र राऊत,आनंद टिळेकर,आकाश डागा आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक सेवा म्हणजे विजय बंब म्हणाले,”गरीब आणि सर्वसामान्य मुलांना शिक्षण देण्याचा हे पवित्र कार्य तुम्ही करत आहात ज्येष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने जे-जे काही सहकार्य लागेल ते यापुढेही आमचा देण्याचा प्रयत्न राहील.असे सांगत वर्पे परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक केले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस वर्पे परिवाराच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या उपक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे-संदीप वर्पे,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष

कार्यक्रमास या शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मुख्याध्यापिका शोभा गाडेकर,मंगल बिबवे, शबनम शेख, कोरडकर,कल्पना निंबाळकर, राहिंज, इनामदार,यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कानडे, वाणी,सोमासे,खैरनार,चौधरी,पवार,साळुंखे,वळवी,बच्छाव अमित पराई,मुबश्शीर शेख,यांचे सह सर्व शिक्षिका व कर्मचारी उपस्थित होते.उपस्थितांचे स्वागत संगिता संदिप वर्पे यांनी तर सूत्रसंचलन अनुराधा सोनवणे यांनी केले.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close
Close