कोपरगाव तालुका
वाहन चालकांनी व्यसनापासून दूर राहण्याची गरज-पोलीस निरीक्षक
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
ऊस वाहतूक करतांना वाहन धारकांनी व्यसनापासून दूर राहिले पाहिजे.व्यसन करून वाहन चालविताना यदाकदाचित अपघात झाल्यास आपल्या चुकीची अनेक कुटुंबांना शिक्षा भोगावी लागते याचे भान आपण जपले पाहिजे असे आवाहन कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी कोळपेवाडी येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक,टायर बैलगाडी,ट्रॅक्टर,ट्रॅक्टर जुगाड अशा एकूण ८७३ वाहनांना गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या वतीने रेडियम रिफ्लेक्टर बसविण्यात आले आहेत.
रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानांतर्गत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या वतीने रेडियम रिफ्लेक्टर वाटप शुभारंभ दौलतराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानांतर्गत नुकतेच कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांच्या हस्ते ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर वाटप करण्यात आले आहे. यावेळी कारखान्याचे महाव्यवस्थापक सुनील कोल्हे,शेतकी अधिकारी कैलास कापसे,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे महाव्यवस्थापक सोपान डांगे, संचालक ज्ञानेश्वर हाळनोर,सुरेगावचे पोलीस पाटील संजय वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जनरल मॅनेजर सुनील कोल्हे म्हणाले कि, सर्व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांनी सुरक्षा सप्ताहाचे नियम पाळून पोलीस प्रशासनाच्या व राज्य परिवहन विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे यामध्ये वाहन धारक व कारखान्याचे हित जोपासले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक गिरीश जगताप,महाव्यवस्थापक सुनील कोल्हे,शेतकी अधिकारी कैलास कापसे,गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे महाव्यवस्थापक सोपान डांगे, संचालक ज्ञानेश्वर हाळनोर,सुरेगावचे पोलीस पाटील संजय वाबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना जनरल मॅनेजर सुनील कोल्हे म्हणाले कि, सर्व ऊस वाहतूक करणाऱ्या वाहन धारकांनी सुरक्षा सप्ताहाचे नियम पाळून पोलीस प्रशासनाच्या व राज्य परिवहन विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे यामध्ये वाहन धारक व कारखान्याचे हित जोपासले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर प्रसंगी पुढे बोलताना ते म्हणाले कि,” काही वाहन चालकांना रस्त्यावरून वाहन चालवितांना भ्रमणध्वनीवर बोलणे व मोठ्या कर्कश आवाजात गाणी ऐकण्याची सवय असते.त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनाचा अंदाज न आल्यामुळे अनेक अपघात घडत असतात.त्यामुळे वाहन धारकांनी अशा चुकीच्या सवयी बंद केल्यास निश्चितपणे अपघात कमी होतील.असा आशावाद त्यांनी शेवटी व्यक्त केला आहे.
यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक,टायर बैलगाडी,ट्रॅक्टर,ट्रॅक्टर जुगाड अशा एकूण ८७३ वाहनांना गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीच्या वतीने रेडियम रिफ्लेक्टर बसविण्यात आले.यावेळी उपस्थितांचे गोदावरी खोरे केन ट्रान्सपोर्ट कंपनीचे महाव्यवस्थापक सोपान डांगे यांनी आभार मानले.