कोपरगाव तालुका
वारीत नेत्र रोग तपासणी शिबिर संपन्न
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव (प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील वारी येथे कोपरगाव तालुका शिवसेना,ठाणे येथील लोककल्याण आरोग्य केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने झालेल्या नेत्र रोग तपासणी शिबिराला वारीकरांनी उस्फुर्त प्रतिसाद देत दोनशेहुन अधिक रुग्णांनी नेत्र तपासणी करून घेतली आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण तर २० टक्के राजकारण या तत्वानुसार सामाजिक कार्यात शिवसेना नेहेमीच अग्रेसर आहे-राजेंद्र झावरे, जिल्हाध्यक्ष उत्तर नगर.
सामाजिक जबाबदारी स्वीकारत सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळत ग्रामस्थांनी शिबिरात सहभाग नोंदवला आहे.
यावेळी ग्रामपंचायत कार्यालया समोर झालेल्या शिबिर उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रथम लोकनियुक्त सरपंच सतिष कानडे होते यावेळी माजी सरपंच रावसाहेब टेके,माजी पंचायत समिती सदस्य अशोक कानडे यांनी मनोगत व्यक्त करत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेनेच्या ८० टक्के समाजकारण तर २० टक्के राजकारण या तत्वानुसार सामाजिक कार्यात शिवसेना नेहेमीच अग्रेसर असल्याचे सांगुन जिल्हाप्रमुख राजेंद्र झावरे,शिवसेना नेते व उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे,तालुका प्रमुख शिवाजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली २३ डिसेंबर ते ३१ डिसेंबर पर्यंत तालुक्यातील अनेक ठिकाणी हे शिबीर संपन्न होत असल्याचे सांगितले आहे.
या शिबिरात जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी करण्यात येउन औषधोपचार करणार असल्याचे सांगितले ठाणे येथील लोककल्याण आरोग्य केंद्राचे डॉ रविंद्र चव्हाण, डॉ धिरज भोसले,डॉ. सदानंद मोरे यांनी रुग्णांची तपासणी करुन चष्म्याचे व औषधाचे वाटप केले आहे.
यावेळी शिबिरात सहभागी सर्व डॉक्टर तसेच सामाजिक उपक्रमांना नेहेमीच सहकार्य करणारे सरपंच सतिश कानडे यांचा आयोजकां मार्फत शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला आहे.
याप्रसंगी माजी सरपंच रावसाहेब टेके,अँड शरद जोशी,निलेश लांडगे,अशोक टेके,राजेंद्र वाळुंज,गोकुळ सात्राळकार,मधुकर टेके,गोरख टेके,बाबासाहेब शिंदे
आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी ते साठी शिवसेनेचे निलेश लांडगे , रामेश्वर कानडे,राजेंद्र वाळुंज तसेच सर्व शिवसेना कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत कर्मचारी रावसाहेब वाघ,सतिश गायकवाड यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.