कोपरगाव तालुका
कोपरगावच्या नवीन साठवण तलावाचे अंदाजपत्रक बनविण्याचे आदेश
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांचा नुकताच संपन्न झालेला कोपरगाव दौरा फलदायी ठरल्याचे दिसत असून आ.आशुतोष काळे यांनी केलेली साठवण तलाव क्र.पाचचे अंदाजपत्रक तयार करण्याच्या सूचना जावं प्राधिकरण विभागाला देण्यात आल्याची विश्वासपात्र बातमी हाती आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केलं आहे.
कोपरगाव शहर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा निर्माण झाल्या आहेत.त्यामुळे आहे त्या पोलीस बळात काम करणे अधिकाऱ्यांना जिकरीचे होता आहे.त्यामुळे जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी त्या त्वरित भरून पोलीस कुमक वाढवावी व तालुक्यातील गुन्ह्याचा आलेख कमी करावा-आ.आशुतोष काळे
नगर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी नव्याने दाखल झालेले जिल्हाधिकरी डॉ.भोसले यांनी नुकताच कोपरगाव दौरा केला होता.त्यावेळी कोपरगावचे आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहराला साठवण तलावाची टंचाई प्रथमदर्शनी त्यांच्या लक्षात आणून दिली होती.व साठवण तलावाच्या पुढील कामाचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी बैठक घ्यावी अशी मागणी केली होती.त्या मागणीची दखल घेवून आज गुरुवार रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली आहे.
यावेळी आ.काळे,जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील,प्रांताधिकारी गोविंद शिंदे,तहसीलदार योगेश चंद्रे,नगराध्यक्ष विजय वहाडणे,राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वर्पे,महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमशेठ बागरेचा,शहराध्यक्ष सुनील गंगुले,नगरसेवक गटनेते विरेन बोरावके,मंदार पहाडे,डॉ.अजय गर्जे,जिनिंग प्रेसिंगचे अध्यक्ष गोरक्षनाथ जामदार,राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष चारुदत्त सिनगर,प्रशांत वाबळे,महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सराफ,कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे या बैठकीसाठी उपस्थित होते.
कोपरगाव शहरासाठी पाणी आरक्षित असून देखील केवळ साठवण क्षमता नसल्यामुळे कोपरगाव शहराच्या नागरिकांना सातत्याने पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे हि वस्तुस्थिती मांडली आहे.व निवडणुकीनंतर राष्ट्रवादीचे नेते खा.शरद पवार यांच्या माध्यमातून या साठवण तलावाचे काम सुरु केले होते. मात्र मागील आठ महिन्यापासून संपूर्ण विश्वावर आलेल्या कोरोना संकटामुळे संपूर्ण आर्थिक व्यवस्था ठप्प झाल्यामुळे निधी मिळण्यात अडचणी येत होत्या.मात्र काही महिन्यापासून अर्थव्यवस्था हळूहळू पूर्वपदावर येत आहे.आता जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना पाच नंबर साठवण तलावाचे अंदाजपत्रक तातडीने करून ते अंदाजपत्रक आठ दिवसाच्या आत सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.