जाहिरात-9423439946
जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

कर्ज वितरण करून करा पथ विक्रेता दिवस साजरा-नगराध्यक्ष वहाडणे

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत शासनाने पथविक्रेत्यांचे कर्ज मंजूर व वितरण करणेसाठी बँकांनी “पथविक्रेता दिवस” साजरा करण्याचे निर्देश देण्यात आले आहे.या अनुषंगाने कोपरगाव शहरातील सर्व शासकीय बँकांनी शनिवार दि.१९ डिसेंबर रोजी “पथविक्रेता दिवस” म्हणून साजरा करून कर्जा साठी आवश्यक असणाऱ्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणा-या पथविक्रेते यांना कर्ज वितरीत करावे असे आवाहन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे यांनी नुकतेच केले आहे.

आता कोणत्याही ओळखपत्राशिवाय दहा हजार रुपयांपर्यंतचं कर्ज मिळण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे.यासाठी सरकारने एक योजना सुरु केली आहे.या योजनेचा लाभ रस्त्यावरील विक्रेते,हात गाडीवर काम करणाऱ्यांना विक्रेत्यांना मिळणार आहे.सरकारने पंतप्रधान स्वनिधी योजना सुरु केली आहे.या योजनेअंतर्गत हातगाडीवर काम करणाऱ्या लोकांना दहा हजार रुपयां पर्यंतची कर्ज दिली जाऊ शकतात.

पंतप्रधान स्वनिधी पोर्टल द्वारे पथविक्रेत्यांनी ऑनलाईन कर्जासाठी ज्या बँकेत अर्ज सादर केले आहे.त्या बँकेच्या कार्यालयीन वेळेत आवश्यक त्या सर्व आधार कार्ड,बँक पासबुक,एल.ओ.आर.आदी कागदपत्रांसह ऑनलाईन अर्जाला जोडला आहे का याची खात्री करावी. बँक शाखेत जावे. आज अखेर कोपरगाव कार्याक्षेत्रातील एकूण ६४५ पथविक्रेत्यांनी ऑनलाईन कर्जाचे अर्ज भरून बँकांकडे पाठविण्यात आलेले आहे.त्यापैकी ४०५ पथविक्रेत्यांचे बँकेकडून कर्ज मंजूर झाले असून ३७३ पथविक्रेते यांना कर्ज वितरीत करण्यात आलेले आहे. या कर्जाचा हप्ता जमा करण्यासाठी सरकारने बारा महिन्यांचा कालावधीही ठेवला आहे.
ज्या पथविक्रेत्यांचे कर्ज मंजूर झाले असून वितरण होण्याचे बाकी आहे असे सर्व पथविक्रेते यांनी कागदपत्रे घेवून शनिवार दिनांक १९ डिसेंबर रोजी संबधित बँकेत हजर रहावे. शहरातील सर्व बँकांनी पोर्टल वरील अर्जांवर कार्यवाहीसह मंजुरी व वितरण करून त्याची माहिती पोर्टलवर अद्यावत करावी.

शासनाच्या मागर्दर्शक सूचना नुसार “पथविक्रेता दिवस” साजरा करून बँकांनी मंजूर लाभार्थींना कर्ज वितरीत करावे.तसेच ज्या पथविक्रेत्यांना यू.पी.आय.आय.डी.क्यु.आर.कोड वापरण्याबाबत काही अडचणी असेल तर कर्ज वितरीत केलेल्या बँकेत संपर्क साधावा.तसेच पथविक्रते यांना काही तांत्रिक अडचणी आल्यास त्यांनी नगरपरिषद कार्यालयातील संबंधित विभागाकडे संपर्क साधावा असे आवाहन नगराध्यक्ष विजय वहाडणे,जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक संदीप वालवलकर व मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close