जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

मंजूर बंधाऱ्याचे काम अल्पावधीत पूर्ण करणार-आश्वासन

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील मंजूर,चास,सह आठ गावातील शेती व शेतकरी यांचे भवितव्य अवलंबून असलेला व २०१९ साली महापुरात वाहून गेलेला मंजूर बंधाऱ्याचे शाश्वत टिकावू काम होण्यासाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर करून मंजूर बंधाऱ्याचे काम पूर्ण करणार असल्याची ग्वाही आ. आशुतोष काळे यांनी एका कार्यक्रमात बोलताना दिली आहे.

“मंजूर सह आठ गावांच्या शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा असलेला मंजूर बंधाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्या माध्यमातून माझा पाठपुरावा सुरु आहे.या बंधाऱ्याच्या डिझाईनचे काम पूर्ण झाले असून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरु आहे.लवकरच ते पूर्ण होऊन आधी मिळवू”-आ.आशुतोष काळे,कोपरगाव.

कोपरगाव तालुक्यातील वेळापूर येथे रा.मा.७ वरील ब्राह्मण नाल्यावरील २ कोटी ९५ लक्ष निधीतून करण्यात येणाऱ्या मोठ्या पुलाचे व पोहोच मार्गाचे बांधकाम कामाचे भूमिपूजन,मंजूर येथे २५ लक्ष निधीतून कारवाडी फाटा ते मंजूर रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करणे,१० लक्ष निधीतून सिद्धेश्वर देवस्थान रस्ता तयार करणे व परिसर सुशोभीकरण,४ लक्ष निधीतून सिद्धेश्वर देवस्थान रस्त्यावर सीडी वर्क कामाचे भूमीपूजन व मंजूर ग्रामपंचायत कार्यालयाच्या नूतन इमारतीचे लोकार्पण आ.काळे यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी ते बोलत होते.

यावेळी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,उपसभापती अर्जुन काळे,कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष सुधाकर रोहोम,संचालक सचिन चांदगुडे,अशोकराव तिरसे,मीननाथ बारगळ,जिल्हा परिषद सदस्य सुधाकर दंडवते,मंजूरच्या सरपंच उषा जामदार उपसरपंच रमेश पगारे,सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत वाकचौरे,पंचायत समिती शाखा अभियंता श्री दिघे आदींसह वेळापूर,मंजूर,कारवाडी व हंडेवाडीचे ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आ. आशुतोष काळे म्हणाले की,”कोपरगाव मतदार संघातील रस्त्यांचा विकास करतांना या रस्त्यावरील पूल देखील तेवढेच महत्वाचे आहेत. पावसाळ्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास या पुलांमुळे अडचणी निर्माण होतात.त्यामुळे रस्त्यांबरोबर अनेक पुलांना निधी मिळावा यासाठी प्रस्ताव दाखल करून निधी मिळविला आहे.तालुक्याच्या पश्चिम भागातील भरवस फाटा ते सावळीविहीर या मार्गावरील ब्राह्मणनाल्यावरील पुलाचा प्रश्न सोडविण्यात यश मिळाले आहे. त्याच बरोबर या भागातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा असलेला मंजूर बंधाऱ्याचा प्रश्न सोडविण्यासाठी जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांच्या माध्यमातून माझा पाठपुरावा सुरु आहे.या बंधाऱ्याच्या डिझाईनचे काम पूर्ण झाले असून अंदाजपत्रक तयार करण्याचे काम सुरु आहे. अंदाजपत्रक तयार झाल्यांनतर प्रशासकीय मान्यता मिळवून लवकरात लवकर निधी मिळवून या मंजूर बंधाऱ्याचे काम मार्गी लावणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close