गुन्हे विषयक
तरुणी गायब,कोपरगावात तक्रार दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील जेऊर-कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत रहिवाशी असलेल्या व मजुरी काम करत असलेल्या आपल्या कुटुंबातून आपली वीस वर्षीय मुलगी दि.१७ ऑक्टोबरच्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास काही एक न सांगता गायब झाली असल्याची तक्रार मुलीच्या पित्याने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुलीचा पिता बाळासाहेब मुरलीधर पवार (वय-४८) यांनी तालुका पोलीस ठाण्यात काल या बाबत तक्रार दाखल करताना म्हटले आहे की,”कुंभारी ग्रामपंचायत हद्दीत आपण आपल्या कुटुंबासमवेत राहत असून दि.१७ ऑक्टोबर रोजी आपण घरात झोपलेलो असताना रात्री अकरा वाजेच्या सुमारास आपली वीस वार्षिय मुलगी आपल्याला काही एक कारण न सांगता कोठेतरी घरातून निघून गेलेली आहे.तिची उंची पाच फूट असून अंगाने सडपातळ आहे.तिचे काळे लांबसडक केस असून कपाळावर गोंदलेला ठिपका आहे.कानात बाजारू झुबे आहे.अंगात नारंगी रंगाचा वनपिस ड्रेस असून त्यावर जांभळ्या रंगाचे जर्किन पायात लाल रंगाचे सॅंडल आहे.या बाबत कोणाला काही माहिती असल्यास कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यास कळवावे असे आवाहन पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी केले आहे.