कोपरगाव तालुका
बोडखे यांची भारतीय सैन्य दलात निवड
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
कोपरगाव तालुक्यातील संवत्सर रामवाडी येथील समाधान अशोक बोडखे यांची भारतीय सैन्य दलात निवड झाली आहे.त्याच्या निवडीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.समाधान याने अतिशय प्रतिकुल परिस्थिती मध्ये यश संपादन केले त्याचे आई-वडील मोलमजुरी करुन त्यांनी त्यांच्या या कष्ट व जिद्दीला साथ दीली,त्यामुळेच त्याला यश प्राप्त झाले आहे.त्याने प्राप्त केलेले यश आजच्या तरुणांना प्रेरणादायी आहे.त्यांचा सत्कार भारतीय जनता पार्टी दिव्यांग सेलचे कोपरगाव तालुका अध्यक्ष मुकुंद काळे यांनी केला आहे.
या वेळी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखानाचे संचालक ज्ञानेश्वर परजणे,संचालक फकीरराव बोरनारे,संवत्सर ग्रामपंचायत सदस्य बापुराव बारहाते,किशोर काळे,महेश परजणे,विकास पोटे,निलेश शिंदे,महेश देवडे,शुभम बोरनारे,सुरज पोटे,युवराज ढमढेरे,विशाल शिंदे,गोकळ बोडखे आदीनीही त्याच्या या यशाचे स्वागत केले आहे.