गुन्हे विषयक
..या गावात सासरी महिलेचा छळ,चौघांवर गुन्हा दाखल
जनशक्ती न्यूजसेवा
कोपरगाव-(प्रतिनिधी)
आपल्या माहेराहून घर बांधण्यासाठी व दुचाकी खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये आणावे यासाठी आपला नवरा कलंदर अहमद शेख,सासरा अहमद दगुभाई शेख,सासू सुन्नीबी अहमद शेख,भाया इम्रान अहमद शेख सर्व रा.कुंभारी या चोघांनी आपला शारीरिक,मानसिक छळ केला असल्याची फिर्याद परवीन कलंदर शेख (वय-२३) ह.रा.नगदवाडी ता.कोपरगाव या महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात दाखल केल्याने कुंभारी परिसरात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी महिलेकडे नवरा कलंदर शेख,सासरा अहमद दगुभाई शेख,सासू सुन्नीबी अहमद शेख,भाया इम्रान अहमद शेख सर्व रा.कुंभारी या चोघांनी माहेराहून घर बांधण्यासाठी व दुचाकी (मोटारसायकल) घेण्यासाठी एक लाख रुपये आणावे या साठी आपला दि.१० मे २०१८ पासून दीड महिन्यांनी ते डिसेंम्बर २०१८ पावेतो सासरी शारीरिक,मानसिक छळ केला असल्याने हा गुन्हा दाखल केला आहे.
सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिलेचे लग्न कुंभारी येथील वर कलंदर शेख यांचेशी दि.१० मे २०१८ रोजी झाले होते.सुरुवातीचे नव्या नवलाईचे नऊ दिवस सरल्यावर दोघांत काही कारणाने बेबनाव तयार झाला.त्यानंतर फिर्यादी महिलेकडे नवरा कलंदर शेख,सासरा अहमद दगुभाई शेख,सासू सुन्नीबी अहमद शेख,भाया इम्रान अहमद शेख सर्व रा.कुंभारी या चोघांनी माहेराहून घर बांधण्यासाठी व दुचाकी (मोटारसायकल) घेण्यासाठी एक लाख रुपये आणावे या साठी आपला दि.१० मे २०१८ पासून दीड महिन्यांनी ते डिसेंम्बर २०१८ पावेतो सासरी शारीरिक,मानसिक छळ केला असल्याची फिर्याद परवीन कलंदर शेख (वय-२३) ह.रा.नगदवाडी या महिलेने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आज दुपारी १.५० वाजता दाखल केली आहे.
कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात या प्रकरणी गु.र.क्रं.५४६/२०२० भा.द.वि.कलम ४९८ (अ)३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे वरील नवरा,सासरा,सासू,भाया या चार आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.एस.एन.भाताने हे करीत आहेत.