जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

घरी सोडण्याच्या कारणावरून विळ्याने मारहाण,दोन जखमी

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील फिर्यादी महिला अरुणाबाई ज्ञानेश्वर चिलक (वय-५०) या शेतमजूर या आपल्या आईला सोडविण्यासाठी देर्डे-चांदवड येथे आल्या असता “तू ,आईला येथे सोडायचे नाही”असे म्हणून आपल्याला व आपले पती ज्ञानेश्वर दत्तात्रय चिलक आदींना आरोपी अमोल दिलीप जोर्वेकर, दिलीप बबन जोर्वेकर,मीनाबाई दिलीप जोर्वेकर आदींनी दि.२४ नोव्हेम्बर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विळ्याने व लाथाबुक्यांनी हातावर ,खांद्यावर मारहाण करून जखमी केले आहे.व शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याने खळबळ उडाली आहे.

फिर्यादी मुलगी अरुणाबाई चिलक यांनी आपल्या आईला राजापूर इथे नेले होते.त्याला आरोपींचा विरोध होता.दोन महिने झाल्यावर फिर्यादी महिला अरुणाबाई चिलक या आपल्या पतीसह आपल्या आई मथूराबाईला सोडविण्यासाठी देर्डे-चांदवड या ठिकाणी दि.२४ नोव्हेम्बर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आल्या असता हि दुर्दैवी घटना घडली आहे.

सदरचे सविस्तर वृत्त असे की,फिर्यादी महिला अरुणाबाई चिलक यांची आई मथुराबाई चिलक यांची मुलीचे निधन झाले म्हणून आईचे दुःख हलके करण्यासाठी दुसऱ्या राजापूर येथील फिर्यादी मुलगी अरुणाबाई चिलक यांनी आपल्या आईला राजापूर इथे नेले होते.त्याला आरोपींचा विरोध होता.दोन महिने झाल्यावर फिर्यादी महिला अरुणाबाई चिलक या आपल्या पतीसह आपल्या आई मथूराबाईला सोडविण्यासाठी देर्डे-चांदवड या ठिकाणी दि.२४ नोव्हेम्बर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आल्या असता त्याचा आरोपी अमोल जोर्वेकर,दिलीप जोर्वेकर,मिनाबाई जोर्वेकर यांना राग आला व त्यांनी आईला सोडविण्यास आलेल्या आपल्या बहिणीला विळा, व लाथा बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली आहे.या प्रकरणी फिर्यादी महिला अरुणाबाई चिलक यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

कोपरगाव तालुका पोलिसानी या प्रकरणी गु.र.क्रं.५४२/२०२० भा.द.वि.कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे कॉ.बी.एल.ढाका हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close