आरोग्य
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ..या नेत्याने घेतली आढावा बैठक

संपादक-नानासाहेब जवरेकोपरगाव-(प्रतिनिधी)कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्याने सोमवार पासून सम्पूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली असून त्या पार्श्वभूमीवर आ. आशुतोष काळे यांनी तहसीलदार योगेश चंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत कोपरगाव तालुका व शहराचा आढावा घेतला आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या ९७ वर होती. मंगळवारी सकाळी ४ नवे रुग्ण आढळल्याने ती १०१ वर पोहचली. त्यानंतर संध्याकाळपर्यंत ही संख्या १०७ वर पोहचली. आता नऊ नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या ११६ झाली. त्यानंतर सहा नवे रुग्ण आढळले आहेत ज्यामुळे ही संख्या १२२ वर पोहचली आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने चिंता वाढवणारीच ही बातमी आहे. तरीही घाबरुन जाऊ नका आणि स्वयंशिस्त पाळा असं आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केलं आहे.या सोबत नागरिकांना संचारबंदी लागू केली आहे.या पार्श्वभूमीवर कोपरगाव तालुका व शहराचा आढावा घेण्यासाठी कोपरगावचे आ. आशुतोष काळे यांनी नुकतीच आढावा बैठक आयोजित केली होती. सदर प्रसंगी कोपरगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी दिलीप सोनकुसळे,कोपरगाव ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौन्दर,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संतोष विधाटे,शहर पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर,ग्रामीणचे पोलीस निरीक्षक अनिल कटके,गट विकास अधिकारी दिलीप सोनकुसळे, मुख्याधिकारी प्रशांत सरोदे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
कोपरगाव तालुक्यात परदेशातून आलेल्या सर्व नागरिकांची माहिती घेऊन त्या सर्व परदेशातून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून सर्वांची प्रकृती उत्तम असून त्यांना कोरोना संदर्भातील कोणत्याही आजाराचे लक्षण नाही व वर्तमानात कोपरगाव तालुक्यात एकही कोरोना विषाणू संशयित अथवा बाधित रुग्ण नाही.डॉ.संतोष विधाते,तालुका वैद्यकीय अधिकारी
त्यावेळी त्यांनी अधिकाऱ्यांसोबत कोरोना व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सोमवार पासून सम्पूर्ण राज्यात संचारबंदी लागू केली असून बुधवार दिनांक २५ मार्च पासून देशाच्या पंतप्रधानांनी सम्पूर्ण देशात एकवीस दिवस शहर बंदचा निर्णय घेतला आहे या बैठकीत आ.आशुतोष काळे यांनी कोपरगाव तालुक्यात परदेशातून आलेल्या नागरिकांची माहिती जाणून घेऊन त्यांची आरोग्य तपासणी करून काय कार्यवाही करण्यात आली याची माहिती कोपरगाव ग्रामीण रुग्णालय अधीक्षक डॉ.कृष्णा फुलसौन्दर,डॉ.संतोष विधाटे यांच्याकडून सविस्तरपणे घेऊन एकवीस दिवस लॉकडावूनअसल्यामुळे जे नागरिक पुणे, मुंबई,आदी मोठ्या शहरातून आले आहेत.ज्या ठिकाणी मोठया प्रमाणात कोरोना विषाणूची नागरिकांना लागण झाली आहे त्या शहरातून कोपरगाव तालुक्यात आलेल्या नागरिकांच्या आरोग्याची तपासणी कशा प्रकारे करण्यात येत आहे.या नागरिकांची प्रकृती कशी आहे त्यांना सर्दी,खोकला,ताप असे आजार तर नाही ना याबाबत माहिती घेतली. त्यावर आरोग्य अधिकाऱ्यांनी कोपरगाव तालुक्यात परदेशातून आलेल्या सर्व नागरिकांची माहिती घेऊन त्या सर्व परदेशातून आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून सर्वांची प्रकृती उत्तम असून त्यांना कोरोना संदर्भातील कोणत्याही आजाराचे लक्षण नाही व आजमितीला कोपरगाव तालुक्यात एकही कोरोना विषाणू संशयित अथवा बाधित रुग्ण नसल्याची माहिती दिली.जर अचानकपणे परिस्थिती उदभवली तर तातडीच्या काय उपाय योजना केल्या जाऊ शकतात व आरोग्य विभागाकडे रुग्णावर उपचार करण्यासाठी उपलब्ध बेड व व्हॅनटीलेटर ची उपलब्धता आहे का याबाबत आ.आशुतोष काळे यांनी माहिती घेतली.राज्यात संचारबंदी असतांना देखील नागरिक मोठया प्रमाणात रस्त्यावर येत आहेत.जीवनाश्यक वस्तूच्या खरेदीसाठी नागरिक गर्दी करीत आहेत त्यासाठी पोलीस प्रशासन काय उपाय योजना करीत आहे.आपल्या अतिआत्मविश्वासमुळे व लहान चुकीची मोठी किंमत मोजावी लागू शकते त्यासाठी सर्व नागरिकांनी एकवीस दिवस घराच्या बाहेर न पडता घरात बसून प्रशासनास सहकार्य करावे. नागरिकांच्या सहकार्यावरच आपण कोरोना विषाणूवर मात करू असा विश्वास त्यांनी यावेळी शेवटी व्यक्त केला आहे.