जाहिरात-9423439946
कोपरगाव तालुका

पो.नि.मानगावकर यांनी सामान्य माणसाला न्याय दिला-नगराध्यक्ष वहाडणे

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे नुकतीच नगर येथें कोतवाली पोलीस ठाण्यात बदली झालेले पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी कोपरगाव शहरात कायदा सुव्यवस्था कठोरपणे राबवून खऱ्या अर्थाने सर्वसामान्य जनतेला न्याय दिला असल्याचे प्रतिपादन कोपरगाव नगरपरिषदेचे अध्यक्ष विजय वहाडणे नुकतेच केले आहे.

पो.नि. मानगावकर यांनी गुन्हेगारी नियंत्रणात आणली,सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवले होते.त्यामुळे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आली होती.खिसेकापू, दागिने ओरबडणाऱ्या टोळ्यांना धाक निर्माण झाला होता.व त्यामुळे गुन्हेगारीचा आलेख किमान पातळीवर स्थिरावला होता-विजय वहाडणे-नगराध्यक्ष कोपरगाव

जिल्ह्यातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या नूतन पोलीस अधीक्षकांनी बदल्या केल्या आहेत त्यात नगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात नुकतीच पो.नि.राकेश मानगावकर यांची आकस्मितरित्या बदली झाली आहे.यांना आज कोपरगाव नगरपरिषद कार्यालयात झालेल्या संपन्न झालेल्या कार्यक्रमात त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला आहे.त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे,नगरसेवक अनिल आव्हाड ,मेहमूद सय्यद,महारुद्र गालट,प्रमोद पाटील,योगेश वाणी,चंद्रकांत साठे,अधिकारी-कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
त्या वेळी पुढे बोलताना ते म्हणाले की,”मानगावकर यांनी कुठल्याही राजकिय दबावाला न जुमानता शहरातील नागरिक,विशेषतः भगिनींना सुरक्षित वाटेल असे काम केले.कोरोना काळात जनतेने मुखपट्ट्या वापराव्यात यासाठी कठोर धोरण ठेवले,”एक गाव एक गणपती” उपक्रम यशस्वी केला,गुन्हेगारी नियंत्रणात आणली,सामाजिक स्वास्थ्य अबाधित ठेवले होते.त्यामुळे शहरातील गुन्हेगारी नियंत्रणात आली होती.खिसेकापू, दागिने ओरबडणाऱ्या टोळ्यांना धाक निर्माण झाला होता.व त्यामुळे गुन्हेगारीचा आलेख किमान पातळीवर स्थिरावला होता.ही बाब अनेक वर्षात घडून एक पोलीस अधिकारी काय करू शकतो याचे आदर्श उदाहरण निर्माण झाले होते.असेही नगराध्यक्ष वहाडणे शेवटी म्हणाले आहे.
या वेळी बोलतांना पोलीस निरीक्षक मानगावकर यांनी सत्काराला उत्तर देताना म्हटले आहे की,” शहरातील नागरिकांनी दिलेले सहकार्य व शुभेच्छा याबद्दल कृतज्ञता या बाबत आपण कायम ऋणी राहू..लहान मोठा असा कुठलाही भेदभाव न करता आपण काम केले.महिलांना सुरक्षित वाटेल असे वातावरण ठेवणे माझे कर्तव्य आहे.राजकिय हस्तक्षेप मला मान्य नसल्याने काम करणे सोपे झाले असेही त्यांनी यावेळी शेवटी बोलताना सांगितले आहे.

यावेळी नगरपरिषदेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close