जाहिरात-9423439946
गुन्हे विषयक

अवैध हत्यार सापडले,एकावर गुन्हा,तालुक्यात खळबळ

जाहिरात-9423439946

न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

कोपरगाव तालुक्यातील शिर्डी-नाशिक राज्य मार्गावर देर्डे-कोऱ्हाळे ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या चौफुलीवर काल अपघातात पाल्टी झालेल्या गाडीत एक संशयास्पद रित्या एक लोखंडी कत्ती सापडली असून त्या प्रकरणी आरोपी जय लालबहादूर यादव रा.एम.एच.रोड गावमोने,पंचशील नगर,ठाणे याचे विरुध्द कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.त्यामुळे कोपरगाव तालुक्यात आणि परिसरात खळबळ उडाली आहे.

  

दरम्यान नुकत्याच झालेल्या अपघाताच्या ठिकाणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेसह पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे यांनी भेट दिली असता सदर गाडीत त्यांनी कसून शोध घेतला असता त्या गाडीत एक ५५ सेंटीमीटर लांबीची २०० रुपये किमतीची लोखंडी कत्ती आढळून आली होती.त्यानंतर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,”फिर्यादी उमेश मालपाणी हे सिन्नर तालुक्यातील पंचाळे येथील रहिवासी असून ते आपल्या काही कामानिमित्त दि.१७ डिसेंबर रोजी सकाळी ११.४५ वाजता आपल्या ताब्यातील मारुती वॅगनार या मोटारीने शिर्डी येथे जात होते.दरम्यान मागील बाजूने ठाणे कडून येणारी एक मारुती स्विफ्ट हि कार आली होती.त्यावरील चालकाने आपल्या ताब्यातील कार भरधाव वेगाने चालवून फिर्यादी मालपाणी यांच्या मारुती वॅगनार या गाडीस जोराची धडक  दिली होती.त्यात सदर गाडी पल्टी होऊन आरोपी फरार झाला होता.या प्रकरणी फिर्यादी रुपेश मालपाणी व त्यांचा सहकारी हे दोघे जखमी झाले होते.

  दरम्यान या प्रकरणी त्यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन आरोपी मारुती स्विफ्ट वरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा क्रं.५८६/२०२३ भा.द.वि.कलम २७९,३३७,४२७, मोटार वाहन कायदा कलम १८४,१७७ प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

  दरम्यान घटनास्थळी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांचेसह पोलीस उपनिरीक्षक महेश कुसारे यांनी भेट दिली असता सदर गाडीत त्यांनी कसून शोध घेतला असता त्या गाडीत एक ५५ सेंटीमीटर लांबीची २०० रुपये किमतीची लोखंडी कत्ती आढळून आली होती त्याचे गांभीर्य ओळखून  पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.५८७/२०२३शस्र अधिनियम १९५९ चे कायदा कलम ४/२५ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोलीस निरीक्षक देसले यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार जी.एस.वांढेकर हे करीत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close