जाहिरात-9423439946
कृषी विभाग

निव्वळ फ्लेक्स लावण्याचे आपले काम नाही-कोपरखिळी लगावली !

जाहिरात-9423439946

जनशक्ती न्यूजसेवा

कोपरगाव-(प्रतिनिधी)

भविष्यात फळपिक विमा भरणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करु मात्र पिक विमा मिळवून दिल्याबद्दल कधीही फ्लेक्स बोर्ड लावणार नाही कारण लोकप्रतिनिधींचे काम हे निधी मिळवून देण्याचे असते पिक विम्याचे फ्लेक्स लावण्याचे नाही अशी कोपरखळी आ.आशुतोष काळे यांनी माजी आ.कोल्हे यांचे नाव न घेता मारली आहे.

यावर्षी ट्रिगर पद्धतीमुळे अनेक शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहिले.त्यासाठी डाळींब,पेरू आदी फल पिकांच्या ट्रिगर पद्धतीमध्ये बदल करावा याबाबत कृषी आयुक्तांची भेट घेतली असून त्यांनी प्रतिसाद दिला आहे-आ.आशुतोष काळे

कोपरगाव तालुका बीजगुणन केंद्र येथे आयोजित कौशल्य आधारित डाळिंब छाटणी व विविध मशागतीची कामे या शेतमजूर प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच आ. काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी उपस्थित प्रशिक्षणार्थी शेतकरी व शेतमजुरांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.
याप्रसंगी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख मार्गदर्शक पुरुषोत्तम हेंद्रे,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,मंडल कृषी अधिकारी माधुरी गावडे,चांगदेव जवने,अविनाश चंदन,मनोज सोनवणे, कृषीमित्र, प्रशिक्षणार्थीं शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.
कोपरगाव तालुका बीजगुणन केंद्र येथे आयोजित कौशल्य आधारित डाळिंब छाटणी व विविध मशागतीची कामे या शेतमजूर प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच आ. काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. याप्रसंगी उपस्थित प्रशिक्षणार्थी शेतकरी व शेतमजुरांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते.याप्रसंगी पंचायत समिती सभापती पौर्णिमा जगधने,कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख मार्गदर्शक पुरुषोत्तम हेंद्रे,तालुका कृषी अधिकारी अशोक आढाव,मंडल कृषी अधिकारी माधुरी गावडे,चांगदेव जवने,अविनाश चंदन,मनोज सोनवणे, कृषीमित्र, प्रशिक्षणार्थीं शेतकरी व शेतमजूर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना ते म्हणाले की, फळपिक उत्पादक शेतकरी विम्याची रक्कम भरतो व त्या शेतकऱ्याचे नुकसान झाल्यास त्या शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळते मात्र दुर्दैवाने ही नुकसानभरपाई मिळवून दिल्याचे देखील फ्लेक्स लावून कोणतेही योगदान नसतांना देखील श्रेय घेण्याचा यापूर्वी प्रयत्न झाला आहे. त्याचप्रमाणे कोपरगाव विधानसभा मतदार संघात प्रत्येक मंडलामध्ये एकच पर्जन्यमापक केंद्र आहे.

यावेळी पुढे बोलतांना ते म्हणाले की,”फळपिक उत्पादक शेतकरी विम्याची रक्कम भरतो व त्या शेतकऱ्याचे नुकसान झाल्यास त्या शेतकऱ्याला नुकसानभरपाई मिळते मात्र दुर्दैवाने ही नुकसान भरपाई मिळवून दिल्याचे देखील फ्लेक्स लावून कोणतेही योगदान नसतांना देखील श्रेय घेण्याचा यापूर्वी प्रयत्न झाला आहे.यावर्षी ट्रिगर पद्धतीमुळे अनेक शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहिले.त्यासाठी डाळींब,पेरू आदी फल पिकांच्या ट्रिगर पद्धतीमध्ये बदल करावा लागेल .याबाबत कृषी आयुक्तांची भेट घेतली असून त्यानी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्याबाबत कृषी विभागाचे विचारविनिमय सुरु असून ट्रिगर बदलल्यास नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नूकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. त्याचप्रमाणे कोपरगाव विधानसभा मतदार संघात प्रत्येक मंडलामध्ये एकच पर्जन्यमापक केंद्र आहे. या हवामान केंद्रात झालेल्या पर्जन्यमानाच्या नोंदीनुसार शेतकऱ्यांची नुकसान भरपाई अवलंबून आहे.मात्र अनेकवेळा या हवामान केंद्रावर पावसाची नोंद होत नाही व मंडलात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते.त्यावेळी हवामान केंद्रावर पावसाची नोंद नसल्यामुळे शेतकरी नुकसान होऊन देखील भरपाई पासून वंचित राहत आहे. त्यासाठी ट्रिगर पद्धती बदलण्याबरोबरच मतदार संघात स्वयंचलीत हवामान केंद्रांची संख्या वाढवावी.यासाठी शासन दरबारी प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले आहे.

जाहिरात-9423439946

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Close